चक्क शिल्पाने नाकारले 10 कोटी, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 07:15 AM2019-08-19T07:15:00+5:302019-08-19T07:15:00+5:30

बॉलिवूडची स्लिम ट्रिम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्रींमध्येही समावेश होतो

Shilpa shetty refuses to endorse a slimming pill rs 10 crore | चक्क शिल्पाने नाकारले 10 कोटी, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

चक्क शिल्पाने नाकारले 10 कोटी, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

googlenewsNext

बॉलिवूडची स्लिम ट्रिम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्रींमध्येही समावेश होतो. शिल्पा नेहमीच योगाभ्यास करताना दिसून येते. तसेच ती आपल्या चाहत्यांसोबतही फिटनेस आणि डाएट टिप्स शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच शिल्पाने तिचे फिटनेस अॅप लाँच केले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार शिल्पाला स्लिमिंग पिलच्या (बारीक होण्याच्या गोळ्या) जाहिरातीची ऑफर आली होती मात्र शिल्पाने ती नाकारली. या जाहिरातीसाठी शिल्पाला 10 कोटी रुपये मिळणार होते.    

रिपोर्टनुसार शिल्पाचे म्हणणे आहे की, तिला गोष्टींवर विश्वास नाही. ती गोष्ट ती करणार नाही. या गोळ्या तुम्हाला कोणतेही डाएट न करता वजन कमी करण्याचे आश्वासन देतात. जे तुमच्या शरीरासाठी हानिकार असू शकते. 


या शिल्पाने 1993 मध्ये शाहरूख खान स्टारर ‘बाजीगर’ या चित्रपटातून आपले फिल्मी करिअर सुरु केले होते. 44 वर्षीय शिल्पा अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये शिल्पाने आपल्या कमबॅकचे संकेत दिलेत. हिंदी चित्रपटांशी माझे नाते संपलेले नाही. ते आजही कायम आहे. सध्या माझ्याकडे कमीत कमी पाच स्क्रिप्ट आहेत. ज्या मी वाचतेय. मला चित्रपटात अभिनय करायचा आहे. पाचपैकी जी स्क्रिप्ट मला आवडेल, त्या चित्रपटातून मी कमबॅक करेल, असे शिल्पाने सांगितले.


सध्या शिल्पा ‘सुपर डान्सर 3’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक आहे. येत्या 23 जूनला या शोचा अंतिम भाग अर्थात फिनाले प्रसारित होत आहे. यानंतर शिल्पा आपल्या चित्रपटाची घोषणा करेल, अशी शक्यता आहे

Web Title: Shilpa shetty refuses to endorse a slimming pill rs 10 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.