ठळक मुद्दे शिल्पा शेट्टीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला फोटो व्हायरल.या ड्रेसमध्ये शिल्पाचा लूक अधिक ग्लॅमरस दिसत आहे.दिवसेंदिवस तिच्या सौंदर्यांत आणखीनच भर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिल्पा शेट्टीच्या स्लिम असण्याचं सा-यांना आजही कौतुक वाटतं. शिल्पाने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत तरीही तिच्या फोटोंकडे पाहिले असता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी शिल्पा बरीच मेहनत घेते. शिल्पाही फिटनेस फ्रिक अभिनेत्री असल्याचे सा-यांना माहिती आहे. फिटनेस व्हिडीओ तिच्या खाजगी आयुष्यातील सगळ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.  तसेच तिच्या फॅन्सना देखील फिट राहाण्यासाठी प्रोत्साहन देते.

 

ती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच डेली वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली शिल्पा तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय वय वाढत असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. 

 

विशेष म्हणजे शिल्पा सध्या सिनेमांपासून लांब असली तरीही तिची लोकप्रियता आजही कायम आहे. नुकतेच शिल्पा शेट्टीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला आपला फोटो शेअऱ केला. फोटो शेअर करत अवघ्या काही मिनीटातच हा फोटो तुफान व्हायरल झाला शिल्पाच्या फोटोला चाहते खूप सारे लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत शिल्पाचा लूक अधिक ग्लॅमरस दिसत असून दिवसेंदिवस तिच्या सौंदर्यांत आणखीनच भर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिल्पाने 'बाजीगर' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. तसेच या चित्रपटात काजोल देखील मुख्य भूमिकेत होती. शिल्पाच्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले होते.  2014 साली प्रदर्शित झालेल्या ढिशक्याऊँ या चित्रपटात तिने काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नव्हती. या नंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. सिनेमात शिल्पा झळकली नसली तरी छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या शोमध्ये परिक्षक म्हणून झळकत असते.


Web Title: Shilpa Shetty New photo Viral On Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.