OMG! पतीचा कारनामा अन् शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचं नुकसान!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:20 PM2021-08-01T13:20:28+5:302021-08-01T13:21:07+5:30

Super Dancer Chapter 4 : पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. अगदी ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवरूनही गायब आहे.

Shilpa Shetty is facing huge loss due to not knowing in Super Dancer 4 | OMG! पतीचा कारनामा अन् शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचं नुकसान!!  

OMG! पतीचा कारनामा अन् शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचं नुकसान!!  

Next
ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर, राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. सोनी टीव्हीसोबतही तिनं कुठलाही संपर्क केलेला नाही.

पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला  (Raj Kundra) अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) जाम चर्चेत आहे. पतीला अटक झाल्यापासून शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. अगदी ‘सुपर डान्सर 4’च्या (Super Dancer 4 )से टवरूनही गायब आहे. पतीला अटक झाली आणि त्याच्या दुस-याच दिवशी मला शूटींगला येणं शक्य नसल्याचं सांगून शिल्पा ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवर गैरहजर राहिली. तिच्या जागी ऐनवेळी करिश्मा कपूर गेस्ट जज बनून शोमध्ये आली. यानंतर काल शनिवारी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे स्पेशल गेस्ट बनून शोमध्ये आलेत. आज रविवारी रात्री प्रसारित होणा-या एपिसोडमध्येही रितेश व जेनेलिया हेच कपल स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे.आता तर शिल्पा शोमध्ये परतणार का? हा एक प्रश्नच आहे. तूर्तास तरी याचं उत्तर देणं कठीण आहे. या शोपासून लांब असल्यामुळं शिल्पाला मोठं आर्थिक नुकसानही सहन करावं लागतंय.
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ‘सुपर डान्सर 4’च्या एका एपिसोडसाठी शिल्पा 18 ते 22 लाख रूपये मानधन घेते. पण आता शोमध्येचं नाही म्हटल्यावर शिल्पाचं सुमारे 2 कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे.

गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली. याच प्रकरणी  शिल्पाचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकारी राज कुंद्रा यालाही सोबत घेऊन गेले होते, तेव्हा राजला पाहून शिल्पा कोसळली होती. तिला अश्रू अनावर झाले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्राइम ब्रँचचे अधिकारी जुहू येथील शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा राजला बघून रागाने ओरडली होती.  या केसने परिवाराची बदनामी केली आहे. अनेक एंडोर्समेंट, बिझनेस डील्स हातून गेल्या आहेत.  हे सर्व तू का केलंस? या प्रकरणामुळे आपली किती बदनामी झाली? , असे ती रडत रडत राजला म्हणाली होती.

चर्चा खरी मानाल तर, राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. सोनी टीव्हीसोबतही तिनं कुठलाही संपर्क केलेला नाही. त्यामुळे ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत चॅनलनं पाहुण्या कलाकारांसोबत शो पुढं चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पती राज कुंद्राच्या अटकेनंतर सुपर डान्सरच्या या सीझनमध्ये तरी शिल्पा शेट्टी परतेल याची शक्यता कमी आहे. कदाचित आता थेट शोच्या पुढच्या सीझनमध्येच ती वापसी करेल. 

Web Title: Shilpa Shetty is facing huge loss due to not knowing in Super Dancer 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app