“अन्न नाहीये... कोरोनामुळे बळी जातायेत, अंत्यसंस्कारही करता येत नाहीयेत”; शिल्पा शेट्टीला कोसळले रडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 07:59 PM2021-04-27T19:59:25+5:302021-04-27T20:00:57+5:30

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत बोलताना तिला अश्रू आवरत नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

Shilpa Shetty is 'experiencing inexplicable pain’, asks fans to donate to an initiative that fights hunger | “अन्न नाहीये... कोरोनामुळे बळी जातायेत, अंत्यसंस्कारही करता येत नाहीयेत”; शिल्पा शेट्टीला कोसळले रडू

“अन्न नाहीये... कोरोनामुळे बळी जातायेत, अंत्यसंस्कारही करता येत नाहीयेत”; शिल्पा शेट्टीला कोसळले रडू

googlenewsNext
ठळक मुद्देकरोना काळातली भयावह परिस्थिती, कोणी आपल्या आईला गमवतंय, तर कुणी आपल्या मुला-मुलींना…असे बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात प्रचंड वाढला असून अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. वेळेत औषधं, इंजेक्शन, ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांचा जीव जात आहे. रुग्णांना आरोग्यसेवा चांगल्या मिळाव्यात यासाठी सोनू सूद, सलमान खान यांसारखे बॉलिवूड कलाकार पुढे आले आहेत. आता शिल्पा शेट्टी ही मदतीसाठी पुढे सरसावलीय.

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत बोलताना तिला अश्रू आवरत नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे. करोना काळातली भयावह परिस्थिती, कोणी आपल्या आईला गमवतंय, तर कुणी आपल्या मुला-मुलींना…असे बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओद्वारे ती लोकांना मदत करण्याचे आवाहन करत आहे. शिल्पा या व्हिडिओद्वारे फ्रंट वर्कसचे आभार मानत असून सकरात्मक वृत्ती ठेवण्याविषयी लोकांना सांगत आहे. 

शिल्पा या व्हिडिओत सांगत आहे की, कोरोना काळात देशात सध्या जी परिस्थिती सुरू आहे, त्यावर बोलण्यासाठी मी आलेय…मी अजिबात ठीक नाही, मीच काय…तर आपण सगळेच सुरक्षित नाहीत... आपल्या आजूबाजूला हतबल करणारी परिस्थिती आहे... हे सगळं पाहून मी खूप विचलित होतेय.... मृत्यू झाल्यानंतर आपल्या माणसांचं अंत्यसंस्कारही करू शकत नाही... 

अन्न नसल्याने आज आपल्या देशात भुकेमुळे लोकांचा मृत्यू होतोय…ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवट्यासोबतच जेवणासाठी देखील लोक त्रस्त आहेत… म्हणूनच मी ‘खाना चाहिये’ या मोहिमेसोबत जोडली गेलीये…आणि लोकांनी ही शक्य तितकी मदत करावी.
 
खाना चाहिये ही मोहीम देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवली जात आहे. 

Web Title: Shilpa Shetty is 'experiencing inexplicable pain’, asks fans to donate to an initiative that fights hunger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.