बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या काही चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. शिल्पा निकम्मा या चित्रपटाद्वारे कमबॅक करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. शिल्पा तिच्या कमबॅकसाठी प्रचंड उत्सुक आहे.


आजतकच्या रिपोर्टनुसार शिल्पा म्हणाली, मी या इंडस्ट्रीचा भाग आहे आणि कुठेही राहिली तरीही मी इंडस्ट्रीचा एक भाग नेहमीच राहणार आहे. ज्यावेळी तुम्ही लाईमलाईटपासून दूर राहता तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीची खूप आठवण येते. माझ्याबाबतीत तसं झालं नाही कारण मी छोट्या पडद्यावर सतत अॅक्टिव्ह असते आणि सिनेमांपासून  मी माझ्या मर्जीने दूर होते.  

     
शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. 

Web Title: Shilpa shetty coming back on silver screen with this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.