इतका माज आला का? शहनाज गिलचा हा व्हिडीओ पाहताच संतापले युजर्स, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:07 PM2021-06-23T17:07:34+5:302021-06-23T17:09:20+5:30

Shehnaaz Gill trolled : तूर्तास शहनाज सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. होय,शहनाजचा एक व्हिडीओ समोर झाला आणि तो पाहून चाहत्यांचा पारा चढला.

Shehnaaz Gill trolled after her team member changed her shoes video viral | इतका माज आला का? शहनाज गिलचा हा व्हिडीओ पाहताच संतापले युजर्स, काय आहे कारण?

इतका माज आला का? शहनाज गिलचा हा व्हिडीओ पाहताच संतापले युजर्स, काय आहे कारण?

Next
ठळक मुद्दे‘बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.  ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

बिग बॉस फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिच्याकडे सध्या कामाची कमी नाही. म्युझिक व्हिडीओ, जाहिरातींपासून अनेक प्रोजेक्ट तिच्याजवळ आहेत. लोकप्रियता म्हणाल चाहते तिच्यावर फिदा आहेत. पण तूर्तास शहनाज सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. होय,शहनाजचा एक व्हिडीओ समोर झाला आणि तो पाहून चाहत्यांचा पारा चढला. मग काय नेटक-यांनी शहनाजला चांगलेच फैलावर घेतले.
हा व्हिडीओ मुंबईतील एका शूटींगदरम्यानचा आहे.  सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. (Shehnaaz Gill trolled after her team member changed her shoes video viral)

यात शहनाज तिच्या स्टाफसोबत सेटबाहेर तिच्या व्हॅनिटीकडे जाताना दिसतेय. शहनाजने हिल्स घातल्या आहेत. पण कदाचित यामुळे तिला चालण्यास त्रास होतोय. अशात एक स्टाफ मेंबर समोर येतो आणि खाली वाकून शहनाजच्या पायातील हिल्स काढतो. यानंतर शहनाज चप्पल घालून पुढे जाते.

शहनाजने एका स्टाफ मेंबरकडून सॅण्डल काढून घ्यावी, नेमकी हीच बाब नेटक-यांना खटकली आणि त्यांनी शहनाजला चांगलेच सुनावले.
 का? तुला स्वत:ची सॅण्डल स्वत: काढताना लाज वाटते का? असा सवाल एका सोशल मीडिया युजरने तिला केला. इतकी चरबी आलीये का? अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शहनाज, तुला लाज वाटायला हवी, असे एका युजरने लिहिले.

बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.  ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.  बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाजची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यामुळे अगदी काही दिवसांत शहनाजची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली होती.  बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ‘शहनाज गिल की शादी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. अर्थात हा शो लोकांना फार आवडला नव्हता. 

कधीकाळी केला होता आत्महत्येचा प्रयत्न
शहनाजला आज एंटरटेनमेंट क्वीन म्हणूनही संबोधले जाते.   ऑनस्क्रीन सा-यांना खळखळून हसवणारी शहनाज   कधी काळी डिप्रेशनमध्येही गेली होती. इतकेच नव्हेतर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. खुद्द तिच्या वडिलांनीच या गोष्टीचा खुलासा केला होता. लिव्ह इन पार्टनरसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे शहनाज डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी सगळ्याच गोष्टी तिला निर्थक वाटू लागल्या होत्या. आयुष्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले होते

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shehnaaz Gill trolled after her team member changed her shoes video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app