शेफाली शहाची हॅट्रीक, दिग्दर्शनातील दुसरा प्रोजेक्ट 'हैप्पी बर्थडे मम्मी जी'च्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 06:13 PM2020-10-16T18:13:15+5:302020-10-16T18:14:18+5:30

शेफाली शहाने आपल्या दुसऱ्या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे

Shefali Shah's hat-trick, second project in directing 'Happy Birthday Mummy G' begins shooting | शेफाली शहाची हॅट्रीक, दिग्दर्शनातील दुसरा प्रोजेक्ट 'हैप्पी बर्थडे मम्मी जी'च्या शूटिंगला सुरुवात

शेफाली शहाची हॅट्रीक, दिग्दर्शनातील दुसरा प्रोजेक्ट 'हैप्पी बर्थडे मम्मी जी'च्या शूटिंगला सुरुवात

googlenewsNext

आपला पहिला लघुपट 'समडे'च्या प्रदर्शनाआधीच, शेफाली शहाने आपल्या दुसऱ्या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे,  ज्याचे नाव 'हैप्पी बर्थडे मम्मी जी’ असे असून त्याची निर्मिती सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडद्वारा करण्यात आली आहे.

नुकतीच, चित्रपट निर्मात्यांनी लवकरच याच्या अधिकृत घोषणेचे संकेत देतानाच या लघुपटाचे सेटवरील काही ऑन-लोकेशन फोटो शेअर केले होते. आणि आता, शेफाली आपल्या सोशल मीडियावर 'हैप्पी बर्थडे मम्मी जी'चा क्लॅप बोर्ड हातात घेताना दिसत आहे. 


शेफाली शहा, या वर्षी सप्टेंबरमध्ये 'समडे' या लघुपटासोबत दिग्दर्शकाच्या खुर्चीत विराजमान झाली आहे. या लघुपटाची कथा तिने नुकतीच या कोविड-19 च्या काळात लिहिली असून यात तिने अभिनय देखील केला आहे.


जेव्हा, 'समडे' आपल्या वैयक्तिक त्रासासोबत झुंजणाऱ्या एक फ्रंट लाइन योद्धा आणि आइसोलेशन याबाबतची कहाणी आहे. तर 'हैप्पी बर्थडे मम्मी जी'मध्ये आइसोलेशनवर पूर्णपणे विपरीत भाष्य करण्यात आले आहे. हा एक मजेदार, हलका-फुलका लघुपट असून लघुपटाच्या शेवटी एक महत्त्वाचा विचार देण्यात आला आहे.


शेफाली शहा यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सत्या चित्रपटातील पारो असो किंवा वक्तमधील सुमित्रा ठाकूर किंवा दिल धडकने दो चित्रपटातील नीलम मेहरा..त्यांनी प्रत्येक भूमिकेतून रसिकांच्या मनात घर कायम केले आहे. तसेच दिल्ली क्राइम वेबसीरिजमधील महिला पोलीसची भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Web Title: Shefali Shah's hat-trick, second project in directing 'Happy Birthday Mummy G' begins shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.