ठळक मुद्देश्रद्धा सध्या ‘साहो’, ‘स्ट्रिट डान्सर’ या सिनेमात बिझी आहे. ‘साहो’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. काही बातम्यांमध्ये तर श्रद्धा कपूर  पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार असा दावाही केला जात आहे. केवळ इतकेच नाही तर श्रद्धाची आई शिवांगी कपूर यांनी या लग्नाची तयारी सुरु केल्याचेही म्हटले जात आहे. आता यावर श्रद्धाचे वडिल आणि अभिनेते शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया दिली आहे.

होय, ताज्या मुलाखतीत शक्ती कपूर यांना लेकीच्या लग्नाबद्दल विचारले गेले. यावर शक्ती कपूर यांनी हटके उत्तर दिले. ‘माझी मुलगी श्रद्धा लग्न करतेय? प्लीज लग्न कधी आहे, हे मला सुद्धा सांगा आणि प्लीज मलाही लग्नाला बोलवा. मी तिचा बाबा आहे, पण मलाच या लग्नाबद्दल माहित नाही,’ असे गमतीत ते म्हणाले. त्यांच्या या उत्तरावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे, श्रद्धा तूर्तास तरी लग्न वगैर करणार नाही.

श्रद्धाचे नाव यापूर्वी अनेकांशी जोडले गेले. आधी ‘आशिकी 2’दरम्यान आदित्य राय कपूरसोबत तिचे नाव जोडले गेले. यानंतर फरहान अख्तरसोबत तिच्या लिंकअपच्या बातम्या आल्या. आता श्रद्धाच्या आयुष्यात रोहन श्रेष्ठाची एन्ट्री झाली आहे. रोहन हा प्रसिद्ध फोटोग्राफर राकेश श्रेष्छा यांचा मुलगा आहे. गत दोन वर्षांपासून नात्यात असलेले श्रद्धा व रोहन लग्नबेडीत अडकण्यासाठी सज्ज असल्याचे मानले जात आहे.

श्रद्धा सध्या ‘साहो’, ‘स्ट्रिट डान्सर’ या सिनेमात बिझी आहे. ‘साहो’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात साऊथ सुपरस्टार प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे. ‘स्ट्रिट डान्सर’मध्ये ती वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यानंतर  ‘बागी 3’ आणि ‘छिछोरा’ या सिनेमांतही ती झळणार आहे. एकंदर काय तर तूर्तास श्रद्धाचे तरी शेड्युल प्रचंड बिझी आहे. यातून ती लग्नासाठी वेळ काढते की नाही, हे बघूच.


Web Title: shakti kapoor talks about shraddha kapoor wedding date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.