शक्ती कपूर दारू आणण्यासाठी चक्क घेऊन गेलेत ड्रम, हा व्हिडिओ पाहून खळखळून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:30 PM2020-06-10T15:30:05+5:302020-06-10T15:30:56+5:30

शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओमध्ये आपल्याला शक्ती कपूर यांचा एक खास अंदाज पाहायला मिळत आहे.

Shakti Kapoor carries a plastic drum as he steps out to buy liqour, watch the video | शक्ती कपूर दारू आणण्यासाठी चक्क घेऊन गेलेत ड्रम, हा व्हिडिओ पाहून खळखळून हसाल

शक्ती कपूर दारू आणण्यासाठी चक्क घेऊन गेलेत ड्रम, हा व्हिडिओ पाहून खळखळून हसाल

googlenewsNext
ठळक मुद्देया व्हिडिओत शक्ती कपूर यांना ड्रम घेऊन जाताना पाहून एक व्यक्ती त्यांना तुम्ही कुठे जात आहात असे विचारत आहे. त्यावर मी दारू घेण्यासाठी जात असल्याचे शक्ती कपूर सांगत आहे

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात सगळीकडे लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. लोकांना सकाळच्या वेळात आणि संध्याकाळच्या वेळात फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. या सगळ्यात आता एका प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओमध्ये आपल्याला शक्ती कपूर यांचा एक खास अंदाज पाहायला मिळत आहे. शक्ती कपूर यांचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्ही देखील खळखळून हसणार यात काहीच शंका नाही. या व्हिडिओत शक्ती कपूर यांनी डोक्यावर एक ड्रम घेऊन ते कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. त्यावर शक्ती कपूर यांना ड्रम घेऊन जाताना पाहून एक व्यक्ती त्यांना तुम्ही कुठे जात आहात असे विचारत आहे. त्यावर शक्ती कपूर त्याला मजेशीर उत्तर देत आहेत. मी दारू घेण्यासाठी जात असल्याचे शक्ती कपूर सांगत आहे. शक्ती कपूर चक्क ड्रम घेऊन दारू घ्यायला जात असल्याने संपूर्ण सोसायटीसाठी तुम्ही दारू आणत आहात का असे ती व्यक्ती त्यांना विचारत आहे.

शक्ती कपूर यांचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर २१ तासांत ३८ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच अनेकांनी भरभरून या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ खूपच मजेशीर असल्याचे लोक प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत.

Web Title: Shakti Kapoor carries a plastic drum as he steps out to buy liqour, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.