ठळक मुद्देसुहाना सध्या लंडनमध्ये शिकतेय. गतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या.

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे कमी नि मुलगी सुहाना खानमुळे अधिक चर्चेत आहे. होय, दर दिवशी सुहानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि सुहाना चर्चेत येते. सध्याही तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोतील सुहानाचा बोल्ड अंदाज चांगलाच चर्चेत आहे.

सुहानाने गत २२ मे रोजी आपला १९ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने आत्ताकुठे सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोत सुहाना मित्रांसोबत पार्टी करताना दिसतेय. पांढºया रंगाच्या बॉडी हगिंग लॉन्ग टी-शर्टमध्ये सुहाना कमालीची सुंदर दिसतेय. 

सुहाना सध्या लंडनमध्ये शिकतेय. गतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. सुहाना सध्या शिकतेय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, असे त्याने सांगितले होते.

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.   कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते.  स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे.  आता तिची ही इच्छा भन्साळी पूर्ण करतात की आणखी कुणी, ते पाहूच.


Web Title: shahrukh khans daughter suhana khan was recently pictures going viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.