shahrukh khan walks holding wife gauri khan dress at an event video viral | Video : नवरा असावा तर असा...! गौरीचा ड्रेस सावरताना दिसला किंग शाहरूख खान
Video : नवरा असावा तर असा...! गौरीचा ड्रेस सावरताना दिसला किंग शाहरूख खान

ठळक मुद्दे गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच  निर्माती आणि मोठी इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा नवा सिनेमा कधी येणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण आता शाहरूखचा एक पर्सनल लाईफ व्हिडीओ मात्र इंटरनेटवर धूम करतोय. होय, पत्नी गौरीसोबतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत शाहरूख गौरीचा ड्रेस सावरताना दिसतोय.
शाहरूख व गौरी एका इव्हेंटमधून बाहेर पडत आहे. गौरी पुढे निघाली असताना अचानक शाहरूख मागून येतो आणि तिचा ड्रेस सावरताना दिसतोय. या व्हिडीओत गौरीने ब्लॅक गाऊन आणि ग्रीन होलोग्राफिक स्लीव्जचा ड्रेस घातलेला आहे तर शाहरूख ब्लॅक सूटमध्ये दिसतोय.


शाहरूख व गौरी बॉलिवूडचे बेस्ट कपल मानले जाते. शाहरूखने गौरीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्या पहिल्या नजरेतच शाहरूख गौरीच्या प्रेमात पडला होता. पण गौरीला प्रपोज करण्याची हिंमत मात्र त्याच्यात नव्हती. गौरीला तीनदा भेटल्यानंतर त्याने तिचा फोन नंबर मागितला होता.


 गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच  निर्माती आणि मोठी इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. गौरीने रणबीर कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवनच्या घराचे इंटीरियर केले आहे. गौरीचे नाव फॉर्च्युच्या 50 पावरफुल भारतीय महिल्यांच्या यादीत सामील झाले आहे.  
गौरीसोबत लग्न केल्यानंतर शाहरुखने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. संदीप खोसलाला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान गौरीने सांगितले होते की, हा प्रवास खूपच सुंदर होता. मी ज्यावेळी मुंबईत आले होते सुरुवातीला माझ्यासाठी सगळे जुळवून घेणे थोडे कठीण होते. मात्र मी तो ही प्रवास एन्जॉय केला. 

Web Title: shahrukh khan walks holding wife gauri khan dress at an event video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.