बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आर्यननं सिंबा या पात्राला आवाज दिला आहे. तर शाहरूख खानने मुफासाला आवाज दिला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.


चाहत्यांचं म्हणणं आहे की आर्यनचा आवाज हुबेहूब शाहरूख खानसारखा वाटतो आहे. आता आर्यनला घेऊन एक वृत्त समोर येत आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आर्यन लंडनमध्ये राहणाऱ्या एका ब्लॉगरला डेट करतो आहे. या मुलीला गौरी खानदेखील भेटली असून तिला देखील आर्यनची पसंती आवडली आहे आणि ती खूप खूश आहे.  


आर्यनच्या अभिनय पदार्पणाबद्दल शाहरूखनं सांगितलं की, त्याचा मुलगा आर्यनला फिल्म मेकिंगमध्ये करियर करायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहरूख खानला मुलाला हॉलिवूडमध्ये लाँच करायचं आहे. आर्यनची बहिण सुहानाने काही दिवसांपूर्वीच ग्रॅज्युएशन पुर्ण केलं आहे.


सुहाना इंग्लंडमधील अर्डिंगली कॉलेजमध्ये शिकत होती. आता तिने न्यूयॉर्कमधील फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे. शाहरूखने बऱ्याच मुलाखतीत सांगितलं की, जर सुहानानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तर मला खूप आनंद होईल. त्यामुळे शाहरूख सुहानाचे शिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत.


शाहरूख सध्या मुलांसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या व्यतित करत आहे. शाहरूखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा किंग खान झिरोमध्ये झळकला होता.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर शाहरूखनं कोणताही सिनेमा साईन केला नाही. सध्या त्याला कुटुंबासोबत वेळ व्यतित करायचा आहे. 
 


Web Title: Shahrukh Khan Son Aaryan Khan Dating A Blogger From London
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.