नवरा असावा तर असा.. गौरीसाठी शाहरुख खान करिअरला करणार होता रामराम.. म्हणाला- मेरे पास सिर्फ गौरी है...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:33 PM2020-06-08T14:33:57+5:302020-06-08T14:43:25+5:30

गौरीने त्याला सोडून दिले होते.

Shahrukh khan said if i have to choose one of gauri and career i will leave the film | नवरा असावा तर असा.. गौरीसाठी शाहरुख खान करिअरला करणार होता रामराम.. म्हणाला- मेरे पास सिर्फ गौरी है...

नवरा असावा तर असा.. गौरीसाठी शाहरुख खान करिअरला करणार होता रामराम.. म्हणाला- मेरे पास सिर्फ गौरी है...

googlenewsNext

अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचे बादशाह म्हटले जाते. आपल्या अभिनय कौशल्यावर शाहरुखने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण शाहरुखच्या आयुष्यात अशी सुद्धा एक वेळी आली होती जेव्हा गौरी खानला मिळवण्यासाठी त्याने आपली कारर्किदपणाला लावली होती. अनुपमा चोपडा यांच्या 'किंग ऑफ बॉलीवुडः शाहरुख खान और सिडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा.' या पुस्तकात त्यांनी गौरी खान आणि शाहरुखच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला होता. 

या पुस्तकात अनुपमा यांनी लिहिले आहे, शाहरुख गौरीला घेऊन पजेसिव्ह होता, म्हणून गौरीने त्याला सोडून दिले होते. त्यानंतर गौरीने त्याला माफ केले. शाहरुखने गौरीच्या कुटुंबाला लग्नासाठी तयार केले होते. यासर्व गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात आहे. 


शाहरुख आणि गौरीने 1991 मध्ये लग्न केले होते. त्यावेळी शाहरुख खान ‘दीवाना’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होता. चित्रपट निर्माते एफ. सी. मेहरा म्हणाले की शाहरुखने त्याचे लग्न तोपर्यंत पुढे ढकलले पाहिजे जोवर सिनेमा रिलीज होत नाही. यावर शाहरुख म्हणाला मी लग्न पुढे ढकलणार नाही, मात्र सिनेमा सोडून देईन. 

1992मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता, 'माझी पत्नी माझ्या आयुष्यात प्रथम येते, आणि जर मला पुढे 
 आयुष्यात कधी गौरी आणि करिअरमधून एखादी गोष्ट निवडायला सांगितली गेली तर मी सिनेमा सोडून देईन, गौरीच्या प्रेमात मी वेडा आहे. माझ्याकडे फक्त गौरी आहे आणि माझं माझं गौरीवर नितांत प्रेम आहे. 

 

Web Title: Shahrukh khan said if i have to choose one of gauri and career i will leave the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.