ठळक मुद्देगतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या.

किंगखान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सतत चर्चेत असते. सध्या सुहाना चर्चेत आली आहे ती, तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमुळे. होय, सुहानाने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. शाहरूख आणि गौरीने लेकीच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुहानाने लंडनच्या Ardingly Collegeमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले.  तिला कॉलेज कडून तिला विशेष पुरस्कारही देण्यात आला. सुहाना कॉलेजमधील ड्रामा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असे आणि तिच्या या योगदानसाठी तिला कॉलेज कडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


सुहानाच्या ग्रॅज्यूएशन सेरेमनीवेळी शाहरुख आणि गौरी खान दोघेही हजर होते. साहजिकच सुहानाला ग्रॅज्युएट झालेले पाहून शाहरूख व गौरीचा ऊर अभिमानाने भरून आला.

शाहरुख खानने   गौरी आणि सुहानासोबत फोटो त्याच्या इन्स्टाग्राम शेअर केला. ‘शेवटचा पिज्झा... शेवटचा ट्रेनचा प्रवास... खºया आयुष्यात पहिले पाऊल... कॉलेज संपले अर्थात शिक्षण नाही’, असे कॅप्शन शाहरुखने या फोटोला दिले.  गौरी खान हिनेही सोशल मीडियावर सुहानाचा एक फोटो शेअर करत, माझी मुलगी सुहाना आता ग्रॅज्यूएट झाली. कॉलेजकडून तिला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असे लिहिले आहे.


गतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. सुहाना सध्या शिकतेय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, असे त्याने सांगितले होते. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.

  कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते.


Web Title: shahrukh khan daughter suhana khan completion of graduation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.