ठळक मुद्देकियाराने सांगितले की, शाहिदच्या शानदार या चित्रपटाची मी फॅन नाहीये. कियाराचे हे म्हणणे शाहिदला देखील तितकेच पटले. तो म्हणाला, मला जमले असते तर माझ्या कारकिर्दीच्या इतिहासातून मी शानदार या चित्रपटाचे नावच डीलिट करून टाकले असते.

कोणत्याही कलाकारासाठी आपला प्रत्येक चित्रपट प्रिय असतो असे आपल्याला नक्कीच वाटते. एखाद्या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले नाही तरी तो चित्रपट त्या कलाकारासाठी खासच असतो. पण आपल्या कारकिर्दीत आपण हा चित्रपट केला होता हेच मला विसरून जायचे आहे असा सांगणारा एखाद-दुसराच कलाकार आपल्याला सापडतो. पण शाहिद कपूरने नुकतीच अशी कबुली दिली आहे. त्याच्या कारकिर्दीतील एक चित्रपट त्याच्या मेमरीतून कायमचा डीलिट करायचा आहे असे त्याचे म्हणणे आहे.

शाहिद कपूरने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा कबीर सिंग हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे, विशेष करून शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. 

कबीर सिंग या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन त्याने आणि कियारा अडवाणी यांनी केले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आणि कियारा एका चॅट शोमध्ये देखील उपस्थित राहिले होते. त्यावेळी शाहिदने त्याच्या कारकिर्दीतील एक चित्रपट त्याला विसरून जायचा आहे ही कबुली दिली. या कार्यक्रमात शाहिदच्या करियरविषयी गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. त्यावेळी कियाराने सांगितले की, शाहिदच्या शानदार या चित्रपटाची मी फॅन नाहीये. कियाराचे हे म्हणणे शाहिदला देखील तितकेच पटले. तो म्हणाला, मला जमले असते तर माझ्या कारकिर्दीच्या इतिहासातून मी शानदार या चित्रपटाचे नावच डीलिट करून टाकले असते. आजच्या काळातील कोणतेच कलाकार एखादा वाईट चित्रपट ते असल्याने चालला असे मान्य करणार नाहीत. माझे फॅन्स तर माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. मी रोजच त्यांचे आभार मानत असतो. मी खरंच काही अतिशय वाईट चित्रपट केले आहेत. 

शानदारमध्ये प्रेक्षकांना एक लग्नसोहळा पाहायला मिळाला होता. २०१५ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला होता. या चित्रपटात शाहिदसोबतच आलिया भट, पंकज कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. 


Web Title: Shahid Kapoor wants to erase Shaandaar film from his career trajectory
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.