ठळक मुद्देपहिल्याच भेटीत जवळजवळ सात तास त्यांनी गप्पा मारल्या होत्या. शाहिद सांगतो, मीराला पहिल्यांदा भेटल्यावर केवळ माझ्या मनात केवळ एकच विचार सुरू होता की, आम्ही दोघे एकटे या भल्यामोठ्या सोफ्यावर बसून गप्पा मारत आहोत. पण 15 मिनिटे तरी आम्ही एकमेकांशी बोलू शकतो का

शाहिद कपूर आणि मीरा रजपूत यांना बॉलिवूडमधील एक क्युट कपल मानले जाते. ते दोघे पुरस्कार सोहळ्यात, समारंभात आवर्जून एकत्र हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर अनेकवेळा ते जीममध्ये देखील एकत्र जातात. शाहिदच्या फॅन्सना त्याचे आणि मीराचे कपल प्रचंड आवडते. त्या दोघांना मीशा आणि झैन अशी दोन मुले आहेत. मीरा आणि शाहिद यांची पहिली भेट कुठे झाली किंवा त्यांची पहिली भेट कशी होती याबाबत त्यांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण नुकत्याच Vogue या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शाहिद आणि मीराने त्यांच्या पहिल्या भेटीविषयी भरभरून गप्पा मारल्या आहेत.

शाहिदने या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, पहिल्याच भेटीत जवळजवळ सात तास त्यांनी गप्पा मारल्या होत्या. शाहिद सांगतो, मीराला पहिल्यांदा भेटल्यावर केवळ माझ्या मनात केवळ एकच विचार सुरू होता की, आम्ही दोघे एकटे या भल्यामोठ्या सोफ्यावर बसून गप्पा मारत आहोत. पण 15 मिनिटे तरी आम्ही एकमेकांशी बोलू शकतो का?

तर पहिल्या भेटीविषयी मीरा सांगते, मी चित्रपटात काम करत नसल्याचा बहुधा आम्हाला फायदाच झाला. कारण एकमेकांसोबत गप्पा मारल्यानंतर आणि एकमेकांना समजून घेतल्यानंतर आम्ही एकमेकांबद्दल मनात काही मतं तयार केली. तेच जर मी इंडस्ट्रीचा भाग असते तर दुसरे आम्हाला कशापद्धतीने ओळखतात, त्याप्रमाणेच आमच्या मनात एकमेकांविषयी चित्र निर्माण झाले असते. 

उडता पंजाब या चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात शाहिदने ड्रग्सच्या अधीन गेलेल्या एका गायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाविषयी मीरा सांगते, हा चित्रपट पाहाताना मी आणि शाहिद एका सोफ्यावर बसले होतो. पण मध्यांतरापर्यंत मी त्याच्यापासून काही फूट दूर जात सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला बसले. मी शाहिदकडे पाहून त्याला विचारले होते, या व्यक्तिरेखेसारखा तू नाहीयेस ना? या व्यक्तिरेखेतील एकही गुण तुझ्यात असेल तर मला सांग... मी आताच इथून निघून जाते. 


Web Title: Shahid Kapoor on first meeting with wife Mira Rajput: ‘My only thought was if we will even last 15 minutes’
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.