shahid kapoor changed his hair style in every film after his father advice said in kapil sharma show | ...म्हणून शाहिद कपूर प्रत्येक चित्रपटात बदलतो हेअरस्टाईल
...म्हणून शाहिद कपूर प्रत्येक चित्रपटात बदलतो हेअरस्टाईल

ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिद व त्याची लीड हिरोईन कियारा अडवाणी या दोघांनी  कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. मग काय, धम्माल मस्तीसोबतच, दोघांनीही अनेक खुलासे केले. याचदरम्यान शाहिदने एक खास खुलासा केला. होय, प्रत्येक सिनेमात शाहिद वेगवेगळ्या हेअरस्टाईलमध्ये का दिसतो, हे त्याने सांगितले.  
 कपिलने शाहिदला त्याच्या प्रत्येक सिनेमातील आगळ्यावेगळ्या हेअरस्टाइलबद्दल विचारले. यावर मी माझ्या वडिलांमुळे हेअरस्टाईलवर वेगवेगळे प्रयोग करतो, असे त्याने सांगितले.

‘ तू प्रत्येक सिनेमामध्ये तुझ्या लुकवर प्रयोग करायला हवेस, असा सल्ला एकदा पापा पंकज कपूर यांनी मला दिला होता. त्यांचा सल्ला मला आवडला. त्यामुळे मी माझ्या लुक सोबतच माझ्या हेअर स्टाइलवरही वेगवेगळे प्रयोग करत असतो. अनुवांशिक कारणाने वयाच्या चाळीशीपर्यंत मला टक्कल पडू शकते, याबद्दलही पापांनी मला सावध केले होते. माझे पापा मला नेहमी चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करतात. मी फार कमी वयात हिरो बनलो होतो, तेव्हा माझे पापा कमालीचे उत्साहित होते, असेही त्याने सांगितले.


कबीर सिंग’ हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. तेलुगू सिनेमामधील अभिनेता विजय देवराकोंडाने केलेली भूमिका हिंदीमध्ये शाहिद कपूर साकारत आहे. या चित्रपटात शाहिद सतत दारूच्या नशेत राहणा-या शीघ्रकोपी डॉक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे.  कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर यात प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.


Web Title: shahid kapoor changed his hair style in every film after his father advice said in kapil sharma show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.