ठळक मुद्देशाहिदच्या एक्स गर्लफ्रेंडपैकी तुला सगळ्यात जास्त कोण आवडते. हा प्रश्न ऐकल्यावर इशान चांगलाच घाबरला होता. त्याने उत्तर दिले की, मला जास्त कोण आवडते असे मी सांगू शकत नाही. पण माझ्या फ्रेंड लिस्ट इक्वेशनमध्ये प्रियांका चोप्राचे नाव सगळ्यात पहिल्यांदा येईल.

शाहिद कपूरच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील गाजले आहे. शाहिदचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आले आहे. प्रियंका चोप्रा, विद्या बालन, करिना कपूर यांसारख्या अभिनेत्रींसोबतची त्याची प्रेमप्रकरणं चांगलीच गाजली आहेत. करिना आणि शाहिद हे तर बॉलिवूडमधील हॉट कपल मानले जात असे. पण त्यांच्या जब वुई मेट या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी त्या दोघांनी त्यांच्या ब्रेकअपविषयी सांगितले.

शाहिद अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत देखील नात्यात असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण ते दोघे नात्यात असल्याचे कधीच त्यांनी कबूल केले नव्हते. पण ते दोघे नात्यात होते असे आता शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरने सांगितले आहे. इशानने नुकतीच नेहा धुपियाच्या BFF with Vogue या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात नेहाने विचारलेल्या एका प्रश्नामुळे इशान चांगलाच टेन्शनमध्ये आला होता. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार नेहाने इशानला विचारले की, शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंडपैकी तुला सगळ्यात जास्त कोण आवडते... हा प्रश्न ऐकल्यावर इशान चांगलाच घाबरला होता. त्याने घाबरतच उत्तर दिले की, हे देवा... मला सगळ्यात जास्त कोण आवडते असे मी सांगू शकत नाही. पण माझ्या फ्रेंड लिस्ट इक्वेशनमध्ये प्रियंका चोप्राचे नाव सगळ्यात पहिल्यांदा येईल.

नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे. नेहा धुपियाच्या कार्यक्रमात आजवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली असून या सेलिब्रेटींनी नेहासोबत आपले अनेक सिक्रेट या कार्यक्रमात शेअर केले आहेत. तसेच या कार्यक्रमात प्रचंड धमाल मस्ती देखील केली आहे.

BFF with Vogue या कार्यक्रमाच्या या तिसऱ्या सिझनमध्ये इशान खट्टरसोबत राजकुमार राव हजेरी लावणार आहे. सोनाली बेंद्रे तिच्या मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री ऑबेरॉय, जान्हवी आणि खुशी कपूर, कतरिना कैफ यांसारखे सेलिब्रेटीदेखील या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत. 


Web Title: Shahid Kapoor and Priyanka Chopra, Shahid's brother Ishan Khattar confesses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.