ठळक मुद्देकबीर सिंग या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जगभरात ३५० कोटी रुपये कमावले आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आजही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम आहे. शाहिद कपूरच्या करिअरमध्ये इतकी कमाई करणार हा पहिला सिनेमा ठरला आहे. शाहिद सध्या कबीर सिंगला मिळालेल्या यशामुळे प्रचंड खूश आहे.

शाहिदच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कबीर सिंग या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जगभरात ३५० कोटी रुपये कमावले आहेत. केवळ २५ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडिया या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कबीर सिंग हा या वर्षातील जगभरात सगळ्यात जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची घौडदौड अशीच सुरू राहिली तर हा चित्रपट लवकर ३६५-३७० करोड इतका गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या वर्षांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये विकी कौशलच्या ऊरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने जगभरात ३३८ करोडचा तर सलमान खानच्या भारत या चित्रपटाने ३०४ करोडचा गल्ला जमवला होता. कबीर सिंग या चित्रपटाने आता या सगळ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

कबीर सिंग या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेही टीका होत असली तरी सुद्धा या चित्रपटगृहातील गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. या सिनेमाची कथा, गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचे तर प्रचंड कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटातील कियाराची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे. या सिनेमातील शाहिदचे अनेक डायलॉग्स प्रचंड फेमस झाले आहेत. 

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स  ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सणकी हिरो अनेकांना भावला नाही. पण काहींना हा कबीर सिंग प्रचंड आवडला असून ते त्याच्या प्रेमात पडले आहेत.

 

English summary :
Kabir Singh Movie Box Office Collection: Kabir Singh has so far earned Rs 350 crores worldwide at the box office. The film has earned a huge box office collection in just 25 days. Kabir Singh has become the highest grosser Hindi movie of this year.


Web Title: The Shahid Kapoor and Kiara Advani starrer Kabir Singh grosses Rs 350 crore in 25 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.