शाहरुखच्या बुडत्या करियरला मिळणार या रिअल लाईफ कथेचा आधार, लवकरच येणार हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:03 PM2020-03-17T13:03:40+5:302020-03-17T13:05:29+5:30

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाची वाट त्याचे चाहते आतुरतेने पाहात आहेत.

Shah Rukh Khan's next to be based on Muzzafarpur shelter mass abuse case of 2018 case? PSC | शाहरुखच्या बुडत्या करियरला मिळणार या रिअल लाईफ कथेचा आधार, लवकरच येणार हा चित्रपट

शाहरुखच्या बुडत्या करियरला मिळणार या रिअल लाईफ कथेचा आधार, लवकरच येणार हा चित्रपट

googlenewsNext
ठळक मुद्दे2018 मध्ये मुझ्झफरपूर बिहारमधील मुझ्झफरपूर बालिकागृहातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराने संपूर्ण देश हादरला होता. याच घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान करत आहे.

शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंंतर शाहरुख गेल्या काही महिन्यांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. झिरो या चित्रपटात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत होते. पण हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. या चित्रपटानंतर आता शाहरुख कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे.

शाहरुख अभिनेता नव्हे तर एक निर्माता म्हणून आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 2018 मध्ये मुझ्झफरपूर बिहारमधील मुझ्झफरपूर बालिकागृहातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराने संपूर्ण देश हादरला होता. याच घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान करत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पुल्कीत सांभाळणार असून त्याने सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित अ्सलेल्या एका चित्रपटाचे नुकतेच दिग्दर्शन केले होते. मुझ्झफरपूर बिहारमधील या केसचा चित्रपटाच्या टीमने प्रचंड अभ्यास केला असून त्यांची पटकथा देखील लिहून झाली आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, एका पत्रकाराच्या नजरेतून या चित्रपटाची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जुलैला सुरू होणार असून या चित्रपटात कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार यावर सध्या टीम काम करत आहे. 

शाहरुख राजकुमार हिरानीच्या चित्रपटात काम करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी न्यूज १८ ने दिले होते. रेड चिलीज या सिनेमाची निर्मिती करणार असून राजकुमार हिरानी पहिल्यांदा विधू विनोद चोप्रा यांच्या बॅनर बाहेर जाऊन सिनेमा करणार आहे. रिपोर्टनुसार ऑगस्ट 2020 मध्ये या सिनेमाची शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग कॅनडा, लंडन आणि गुजरातमध्ये होणार आहे. सिनेमात करिना कपूर आणि काजोलची एंट्री होऊ शकते. काजोल आणि शाहरुखच्या जोडीने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

तसेच शाहरुख खान शेरशाहमध्ये देखील कॅमिओ करणार आहे. शेरशाह चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यात कारगिल वॉरमधील हिरो विक्रम बत्रा यांची कथा सांगण्यात येणार आहे. या बॉयोपिकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा डबल रोल साकारतो आहे. 

Web Title: Shah Rukh Khan's next to be based on Muzzafarpur shelter mass abuse case of 2018 case? PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.