ठळक मुद्देमी सध्या तरी कोणत्याही चित्रपटामध्ये काम करत नाहीये. झिरो या चित्रपटानंतर आता कोणत्या चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा होत नाहीये. मला वाटतेय की, मी थोडा वेळ स्वतःला द्यायला पाहिजे... या दरम्यान चित्रपट पाहाण्याचे, अनेक पुस्तकं वाचण्याचे मी ठरवले आहे.

शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हटले जाते. तो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, चक दे इंडिया, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 

शाहरुखचा चित्रपट म्हटला की, तो हिटच होणार असे एकेकाळचे गणित होते. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला झिरो हा त्याचा चित्रपट दणक्यात आपटला. या चित्रपटासाठी शाहरुखने प्रचंड मेहनत घेतली होती. पण हा चित्रपट त्याच्या फॅन्सना भावला नाही. हा चित्रपट फ्लॉप झाला याचा शाहरुखला चांगलाच धक्का बसला आहे. झिरो या चित्रपटानंतर शाहरुख कोणत्या चित्रपटात झळकणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. पण शाहरुखच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे.

झिरो या चित्रपटानंतर शाहरुखने अद्याप कोणताच चित्रपट साईन केलेला नाहीये आणि शाहरुखनेच ही गोष्ट आता कबूल केली आहे. शाहरुखने कोणताही चित्रपट साईन न करण्यामागे एक खास कारण आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, मी सध्या तरी कोणत्याही चित्रपटामध्ये काम करत नाहीये. माझ्या एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण संपेपर्यंतच मी माझ्या दुसऱ्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करतो. त्यामुळे मी माझ्या कामात सतत व्यग्र असतो. पण झिरो या चित्रपटानंतर आता कोणत्या चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा होत नाहीये. मला वाटतेय की, मी थोडा वेळ स्वतःला द्यायला पाहिजे... या दरम्यान चित्रपट पाहाण्याचे, अनेक पुस्तकं वाचण्याचे मी ठरवले आहे. माझी मुलगी सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे तर मुलाचे शिक्षण लवकरच संपणार आहे. त्यामुळे मी सध्या जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबियांसोबत घालवण्याचे ठरवले आहे. 


 


Web Title: Shah Rukh Khan reveals reason behind not signing any film post Zero
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.