Shabana Azmi had a terrible accident, revealed Javed Akhtar 3 months later TJL | शबाना आझमींचा झाला होता भीषण अपघात, 3 महिन्यानंतर जावेद अख्तर यांनी केला खुलासा

शबाना आझमींचा झाला होता भीषण अपघात, 3 महिन्यानंतर जावेद अख्तर यांनी केला खुलासा

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना यांचा 18 जानेवारी रोजी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातानंतर आता जळपास 3 महिन्यांनंतर शबाना आझमी यांचे पती गीतकार जावेद अख्तर यांनी पहिल्यांदा या अपघाताबद्दल सांगितले.

अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी सांगितले की, 'कोणाला माहिती होते की, आमच्या सोबत असे काही घडेल. शबाना ज्या अपघातातून गेली तो मृत्यूच्या जवळ घेऊन जाणारा होता. आम्ही तेव्हा दुसऱ्या कारमध्ये होतो. ती कार आमच्या कारच्या मागे होती ज्यात मागच्या सीटवर शबाना झोपली होती.'पुढे जावेद म्हणाले की, 'अपघात झाल्यानंतर आम्ही मागे पळालो. माझ्या डोक्यात त्यावेळी आले की, शबाना जिवंत आहे ना ? कारण गाडीची अवस्था खूप वाईट झाली होती. कसे तरी आम्ही तिला बाहेर काढले ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या चेहऱ्यावर सगळे रक्त होते. तिच्या नाकातूनही रक्त येत होते. शरीरावर कोणतीही जखम नव्हती. पण हे सगळे पाहिल्यानंतर अस्वस्थ झालो होतो. सर्व काही नॉर्मल व्हायला खूप वेळ लागला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shabana Azmi had a terrible accident, revealed Javed Akhtar 3 months later TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.