मलायका अरोराचा स्टायलिश लूक पाहून ट्रोलर्स म्हणाले - 'अर्जुन बेटा..अम्माला सांभाळ'

By तेजल गावडे | Published: October 8, 2020 06:56 PM2020-10-08T18:56:50+5:302020-10-08T18:57:23+5:30

अभिनेत्री मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोशूटमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. मात्र काही वेळेला तिला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो.

Seeing Malaika Arora's stylish look, the trolls said - 'Arjun son..take care of mother' | मलायका अरोराचा स्टायलिश लूक पाहून ट्रोलर्स म्हणाले - 'अर्जुन बेटा..अम्माला सांभाळ'

मलायका अरोराचा स्टायलिश लूक पाहून ट्रोलर्स म्हणाले - 'अर्जुन बेटा..अम्माला सांभाळ'

googlenewsNext

बॉलिवूडची मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोशूटमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती आणि आता ती त्यातून पूर्णपणे बरीदेखील झाली आहे. आता ती पूर्ण बरी झाल्यानंतर इंडिया बेस्ट डान्सरच्या मंचावर दाखल देखील झाली आहे.


मलायका अरोरा वयाची चाळीशी ओलांडलेली असतानाही आजही ती फिट आहे. बऱ्याचदा ती स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत येत असते. तसेच काही वेळेला तिला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो. नुकतीच ती इंडियाज बेस्ट डान्सर या शोच्या मंचावर पोहचली. तिथे तिचे चाहते तिला पाहून खूप खूश झाले. तर ट्रोलर्सने तिच्यावर वाईट कमेंट्स करत ट्रोल केले. 


मलायका अरोराने प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण तहिलियानीच्या ब्राइडल अँड फेस्टिववेअर कलेक्शन २०२० मधील पिवळ्या रंगाचा वन शोल्डर लहेंगा सेट निवडला होता.जॉर्जेट फॅब्रिकने बनलेल्या बँडेज चोळी आणि मॅचिंग दुपट्टा होता. मलायकाने या लहेंग्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोवरून तिला खूप ट्रोल करायला सुरूवात केली. मलायका अरोराचे कपडे पाहून ट्रोलर्स म्हणाले वाह आंटी जी तुम्ही खूप फिट आहात. काहींनी तिला बुढ्ढी म्हटलं. इतकंच नाही तर अर्जुन कपूरचेही नाव घेत कमेंट्स केल्या. एकाने अर्जुन बेटा अम्माला सांभाळ अशी कमेंट केली आहे.

मलायका अरोराला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावरून अपडेट देत राहत होती. आता ती बरी झाली आहे तर लगेच बाहेर पडताना दिसली. ती तिच्या घराजवळील सलूनमध्ये गेली होती. तिथे असलेल्या फोटोग्राफर्सनी तिला लगेच कॅमेरात कैद केलं. पण यावरून लोक तिला ट्रोल करू लागले.

मलायकाने कोरोनातून बरी झाल्यावर तिचा अनुभव शेअर केला होता. मलायकाने कोरोनातून बरी झाल्याची बातमी इन्स्टाग्रामवर दिली होती. तिने लिहिले होते की, रूमच्या बाहेर निघणेही आउटींग करण्यासारखं आहे.

Web Title: Seeing Malaika Arora's stylish look, the trolls said - 'Arjun son..take care of mother'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.