बॉलिवूडच्या सध्याच्या नव्या फळीतील अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट हिच्याकडे पाहिले जातेय. अशातच नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिने देखील आलिया भट्ट हिला स्वत:चे प्रेरणास्थान मानले आहे. आलिया भट्टची भूमिका निवड, अभिनय यामुळे तिने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण, आता आमच्याकडे तिच्याबद्दल एक वेगळीच बातमी आहे. 

होय, आलिया भट्ट हिने नुकतेच स्वत:चे ‘ड्रीम हाऊस’ पूर्ण केले आहे. असं म्हटलं जातंय की, हे घर जवळपास १३ कोटींचे आहे. हे संपूर्ण घर तयार होण्यासाठी २ वर्ष लागले. अलीकडेच लाँच झालेल्या ‘आलियाबी’ या यूट्यूब चॅनेलवर तिने तिच्या या जुहू येथील घराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या फ्लॅटला तिने २०१७ मध्येच खरेदी केले होते. आता ती तिची बहीण शाहीन हिच्यासोबत तिथे शिफ्ट झाली आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट ही तिच्या नवीन घराच्या व्हिडीओत संपूर्ण घर कशाप्रकारे सजवले आहे? तिची बहीण शाहीन आणि इंटेरिअर डिझायनरने कशी मदत केली आहे? हे संपूर्ण चाहत्यांना सांगते. ती तिच्या घराबद्दल आणि मिळणाऱ्या  जागेबद्दल किती जागरूक आहे? हे देखील ती सांगतेय. ती सांगते की, हे घर तिच्यासाठी खूप खास आहे कारण तिने हे स्वत:च्या खर्चाने उभे केले आहे. 

ती पुढे हे देखील सांगते की, सुरूवातीला मी एकटीच या नव्या घरात शिफ्ट होणार होते पण, नंतर मी माझ्या बहीणीसोबत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. खरंतर जुन्या घरातून नव्या घरात शिफ्ट होण्याचा विचार माझ्यासाठी तेवढा महत्त्वपूर्ण आहे.’


Web Title: See Pics: Alia Bhatt's 'Dream House' worth 13 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.