अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:19 PM2019-02-23T12:19:46+5:302019-02-23T12:21:00+5:30

बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री आणि स्तंभलेखिका पूजा बेदी वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने ही माहिती दिली आहे.

This is the second wedding of Pooja Bedi at the age of 48 | अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न

अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न

googlenewsNext

अभिनेत्री पूजा बेदी लवकरच पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. पूजा बेदी वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. घटस्फोटानंतर १५ वर्षांनी तिने हा निर्णय घेतला आहे. पूजा आणि मानेक या दोघांचा साखरपूडा झाला असून त्याचा फोटो पूजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हॅलेंटाइन डे रोजी साखरपूडा करण्यात आला होता.

आपल्या लग्नाबद्दल पूजा खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले आहे. मागील अनेक महिन्यांपासून पूजा आणि मानेकचे प्रेमसंबध होते अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसातच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

पूजा बेदी आणि मानेक काँन्ट्रेक्टर हे दोघे एकाच शाळेत शिकले आहेत. शाळेत मानेक पूजाचा सिनियर होता. मानेक हा गोव्याला राहतो. मानेक काँन्टेक्टर ५० वर्षाचा आहे. पूजा नेहमी मानेक सोबतचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करते.

२००३ साली फरहान फर्नीचरवाला याच्याशी पूजाचा घटस्फोट झाला होता. १२ वर्षांच्या लग्नानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला होता. फरहान कडून पूजाला दोन मुले आहेत. पूजा या वयात दुसरे लग्न करते म्हटल्यावर वडीलांच्या पावलांवर पाऊल टाकत असल्याची चर्चा सध्या होते आहे. कारण पूजाचे वडील अभिनेता कबीर बेदीने वयाच्या सत्तराव्या वर्षी लग्न केले होते.

Web Title: This is the second wedding of Pooja Bedi at the age of 48

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.