सुशांत सिंह राजपूतचा पहिला वॅक्स स्टॅच्यू आला समोर, या चाहत्याने घडवली ही किमया, हुबेहुब दिसतोय सुशांत सारखा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 10:19 PM2020-09-18T22:19:57+5:302020-09-18T22:28:12+5:30

. १७ सप्टेंबरलाच सुशांतच्या पुतळ्याचे अनावरन करण्यात आले आहे. सर्व सामान्य जनेतेलाही हा पुतळा पाहाता यावा यासाठी सुशांतचा पुतळा हा म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.

Sculptor Sukanto Roy Has Created A Wax Statue Of Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतचा पहिला वॅक्स स्टॅच्यू आला समोर, या चाहत्याने घडवली ही किमया, हुबेहुब दिसतोय सुशांत सारखा

सुशांत सिंह राजपूतचा पहिला वॅक्स स्टॅच्यू आला समोर, या चाहत्याने घडवली ही किमया, हुबेहुब दिसतोय सुशांत सारखा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या बातमीने सुशांतच्या कोट्यावधी चाहत्यांना जबर धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केली यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. सुशांतच्या निधनानंतर त्याचे कुटुंब आणि त्याचे चाहते सतत न्यायासाठी मागणी करत आहेत. दरम्यान, सुशांतच्या मेणाचा पुतळा लंडनमधील मॅडम तुसाद म्युझियममध्ये बनवावा. अशी चाहत्यांनी मागणी केली होती. अद्यापतरी मॅडम तुसादमध्ये असा कोणताही उपक्रम झाला नाही, परंतु पश्चिम बंगालमधील सुशांतच्या एका चाहत्याने हा उपक्रम करून दाखवला आहे. सुशांत दिसतो अगदी तसाच मेणाचा पुतळा त्याने बनवला आहे. 


सुशांतला जावून तीन महिन्याहून अधिक कालावधी झाला असला तरी एकही दिवस असा नाही जिथे त्याच्या चाहत्यांनी सुशांतची आठवण काढली नाही. त्याच्याविषयी लिहीणे, त्याचे जुने फोटो शेअर करत त्याच्या आठवणीत रमणे, अगदी त्याच प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये राहणारे सुकांतो रॉय हे देखील सुशांतचे मोठे चाहते आहेत. सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी याहून चांगलं काही अशूच शकत नाही म्हणून थेट हुबेहुब त्याच्यासारखा दिसणारा पुतळाच त्यांनी बनवत सा-यांनाचा आश्चर्यचकित केले आहे.

 

१७ सप्टेंबरलाच सुशांतच्या पुतळ्याचे अनावरन करण्यात आले आहे. सर्व सामान्य जनेतेलाही हा पुतळा पाहाता यावा यासाठी सुशांतचा पुतळा हा म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. तुर्तास या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहते कमेंट देत आपल्या भावना व्यक्त करत आहेत 

सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये होते इतके कोटी रुपये, बँक डिटेल्समुळे झाला अनेक गोष्टींचा पर्दाफाश

सुशांतसिंह मृत्यू आता सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीन एजेंसी तपास करत आहेत. त्यात या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे. यात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने कारवाई करत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला आणि तिचा भाऊ शोविकला अटक केली. दरम्यान आता सुशांतच्या बँक अकाउंटचा तपशील समोर आला आहे. ज्यातून काही गोष्टींचा पर्दाफाश झाला आहे. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडमधील कारकीर्दीतून सुशांत सिंग राजपूतने जवळपास ६० कोटी रुपये कमविले होते. त्याच्या या बँक खात्यावर नॉमिनी त्याची बहिण प्रियंका आहे. सुशांतने अंकिता आणि स्वत:च्या नावे जवळपास ३ कोटींचा प्लॉट खरेदी केला होता. मृत्यूसमयी त्याच्या खात्यावर अडीच ते तीन कोटी रुपये शिल्लक होते.
 
सुशांत प्रकरणात नवीन खुलासा, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकचं सीक्रेट चॅट आलं समोर

रियाचा भाऊ शोविक आणि ड्रग्स डिलर अनुज केशवानी यांचे एक चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये अनुज केशवानी आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्स डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. या चॅटमध्ये अनुज केशवानीने शोविकला बेकायदेशीर ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत. या चॅटनुसार पहिले अनुजने गांजाचे फोटो पाठवले मग शोविकने उत्तर दिले की ठीक आहे मला हे दे. जो माल पाठवणार आहे त्याची क्वॉलिटी चांगली ठेव, स्टफ चांगला ठेव. मागे जो माल आला होता तो चांगला नव्हता. तसेच या चॅटमध्ये ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत. या चॅटमधून स्पष्ट समजतंय की हे ड्रग्स डिलेव्हरीबद्दल बोलणे चालू आहे.

Web Title: Sculptor Sukanto Roy Has Created A Wax Statue Of Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.