ठळक मुद्देदिव्या खोसला कुमार सत्यमेव २ या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे दिव्या १५ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. 

जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच सत्यमेव २ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील एक अभिनेत्री तब्बल १५ वर्षांनंतर कमबॅक करणार आहे. 

सत्यमेव जयते या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत आपल्याला आयशा शर्मा ही नायिका पाहायला मिळाली होती. पण आता सत्यमेव २ या चित्रपटात तिची जागा एका दुसऱ्या अभिनेत्रीने घेतली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून दिव्या खोसला कुमार आहे. दिव्या सत्यमेव २ या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे दिव्या १५ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. 

दिव्याने २००४ साली अनिल शर्मा यांच्या अब तुम्हारे हवाले वतन साथियो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची अधिक चर्चा झाली होती. या चित्रपटात अक्षय कुमार तिच्या नायकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटानंतर एकाच वर्षांत तिने टी-सिरिजचा सर्वेसर्वा भुषण कुमारसोबत लग्न केले. यानंतर ती अभिनयक्षेत्रापासून दूर होती. पण बॉलिवूडच्या पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात तिला पाहायला मिळत होते. या दरम्यान तिने २० म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन केले. एवढेच नव्हे तर तिने २०१४ मध्ये यारिया आणि त्यानंतर सनम से या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते. तिच्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. पण आता १५ वर्षांनंतर ती अभिनयक्षेत्राकडे वळत आहे.

सत्यमेव जयते या चित्रपटाचे निर्माते भुषण कुमार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी करणार आहे. या चित्रपटाच्या बाबतीत मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात दिव्या खोसलाची व्यक्तिरेखा अतिशय सक्षम असणार आहे. सत्यमेव जयते या चित्रपटाची कथा आणि सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. त्यामुळे सत्यमेव जयते २ या चित्रपटावर देखील या चित्रपटाची टीम प्रचंड मेहनत घेत आहे.


Web Title: Satyameva Jayate 2: John Abraham To Romance An Actress Who’s Making A Comeback After 15 Years!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.