गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन आणि छोटे नबाव सैफ अली खानची लेक अभिनेत्री सारा अली खानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. पुन्हा एकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सारा आणि कार्तिक त्यांच्या आगामी 'लव आज कल २' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये शिमल्यात बिझी आहेत. शुटिंगमधून उसंत मिळाल्यानंतर हे लव्हबर्ड्स एकत्र वेळ घालवतायत. मोकळ्या वेळात सारा आणि कार्तिक फिरायला जातात. नुकतंच दोघंही शिमल्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगामध्ये आनंद लुटत असल्याचं दिसून आलं. 


यावेळी दोघांनीही शिमल्याची पारंपरिक टोपी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. शिवाय लवकरच मिंगल व्हायला आवडेल हे सांगायलाही तो विसरत नाही. 

 

कार्तिक आर्यनचा नवा फंडा; ‘नकोशा’ निर्मात्यांना दूर ठेवण्यासाठी लढवली अजब शक्कल?


‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि पाठोपाठ ‘लुका छुपी’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आज मै उपर आसमाँ निचे अशीच त्याची अवस्था झाली असणरार. मेनस्ट्रीम चित्रपटांमागे न धावता कार्तिकने सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनाम, प्यार का पंचनामा 2, आकाशवाणी असे वेगवेगळ्या धाटणीचे हिट चित्रपट दिलेत आणि अचानक निर्मात्यांचे त्याने लक्ष वेधून घेतले आहे हेच कारण आहेत की, कार्तिकने फीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. यामागे एक खास कारण आहे. होय, ज्यांच्यासोबत काम करायचे नाही, अशा निर्मात्यांना दूर ठेवण्यासाठी कार्तिकने म्हणे, आपली फी अव्वाच्या सव्वा वाढवली आहे. त्याच्या फीचा आकडा बघून, निर्मात्यांचे डोळे पांढरे होतात. साहजिकच,अनेकजण त्याच्या जवळही फिरकत नाहीत आणि अशाप्रकारे ज्यांच्यासोबत काम करायचे नाही, असे निर्माते त्याच्यापासून आपसूक दूर राहतात. अर्थात मोठ्या निर्मात्यांसोबत काम करताना कार्तिक स्वत:हून आपल्या फीमध्ये कपात करतो. कार्तिकचा हा फंडा अनेकांसाठी नवा आहे. पण तो पाहून बॉलिवूडच्या अनेकांची कार्तिकबद्दल ‘काना मागून आला अन् तिखट झाला’ अशीच भावना झाली नसेल तर नवल.
 


Web Title: Sara Khan & Kartik Aryan Enjoys Free Time In Shimla While Shooting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.