सारा अली खानला आई अमृता सिंगच्या 'या' दोन सिनेमात करायचंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 08:00 PM2019-02-03T20:00:00+5:302019-02-03T20:00:00+5:30

सारा अली खान पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साराने 'केदारनाथ'मधून डेब्यू केल्यानंतर रणवीर सिंगच्या अपोझिट 'सिम्बा'मध्ये तिची वर्णी लागली.

Sara ali khan reveals the two movies of mother amrita singh that she would like want to do | सारा अली खानला आई अमृता सिंगच्या 'या' दोन सिनेमात करायचंय काम

सारा अली खानला आई अमृता सिंगच्या 'या' दोन सिनेमात करायचंय काम

googlenewsNext
ठळक मुद्देसिम्बाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच धुमाकूळ घातलेसाराकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स येतायेत

सारा अली खान पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साराने 'केदारनाथ'मधून डेब्यू केल्यानंतर रणवीर सिंगच्या अपोझिट 'सिम्बा'मध्ये तिची वर्णी लागली. सिम्बाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच धुमाकूळ घातले. सध्या साराकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत. मात्र साराला आई अमृता सिंगच्या दोन सिनेमांमध्ये काम करायची इच्छा आहे.  

 
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, ''मला नाही वाटतात मी आई इतका चांगला अभिनय करु शकते. हा पण, मला तिच्या 'चमेली की शादी' आणि 'आईना'मध्ये तिने साकारलेल्या भूमिका करायला आवडतील. याशिवाय मला तिचा बेताब सिनेमा देखील आवडला होता. यात ती खूपच सुंदर दिसली होती.'' 


साराच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर ती 'लव्ह आज कल २' सिनेमात झळकणार होती. मात्र सिनेमाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या सिनेमातून माघार घेतली आहे. लव्ह आज कल २च्या माध्यमातून पहिल्यांदाच मला वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र सिनेमात माझ्या वाट्याला चांगली भूमिका आली असती तर मी नक्कीच या सिनेमाचा विचार केला असता. या सिनेमामध्ये माझी भूमिका केवळ नावापुरती आहे, त्यामुळे मी या सिनेमासाठी माझा नकार दिला आहे, असे साराने एका मुलाखतीत सांगितले. 'लव्ह आज कल २' हा सिनेमा इम्तियाज अली दिग्दर्शित करणार आहेत.

Web Title: Sara ali khan reveals the two movies of mother amrita singh that she would like want to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.