सारा अली खानने अक्षरशः हात जोडून रोहित शेट्टीकडे मागितले होते काम, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 10:57 AM2021-06-12T10:57:57+5:302021-06-12T10:58:31+5:30

सारा अली खान आणि रोहित शेट्टीचा एक जुना व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसतो आहे.

Sara Ali Khan joined hands with Rohit Shetty and asked for work, the video is going viral | सारा अली खानने अक्षरशः हात जोडून रोहित शेट्टीकडे मागितले होते काम, व्हिडीओ होतोय व्हायरल

सारा अली खानने अक्षरशः हात जोडून रोहित शेट्टीकडे मागितले होते काम, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीत घराणेशाहीच्या मुद्द्याला तीव्र विरोध होऊ लागला आणि लोक स्टारकिड्सवर निशाणा साधू लागले. त्यावेळी सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर, आलिया भट, अनन्या पांडे आणि करण जोहर यांच्यासह बऱ्याच कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सारा अली खान आणि रोहित शेट्टीचा एक जुना व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत रोहित शेट्टी साराच्या स्ट्रगलची स्टोरी द कपिल शर्मा शोमध्ये सांगताना दिसतो आहे.


द कपिल शर्मा शोचे जुने व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात रोहित शेट्टी, सारा अली खान आणि रणवीर सिंग सोबत सिंबाचे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. या व्हिडीओत रोहित शेट्टी, सारा अली खानच्या स्वभाव आणि सोज्वळतेबद्दल बोलत आहेत. या व्हिडीओत ते सांगत आहेत की सिंबामध्ये सारा अली खानला का कास्ट केले.


या व्हिडीओत रोहित शेट्टी कॉमेडियन कपिल शर्माने साराबद्दल एक प्रश्न विचारला त्यावर तो म्हणाला की, आता ही स्टार बनली आहे तर तर मी हिच्याबद्दल बोलू शकतो. सर मला प्लीझ काम द्या, असे हिने हात जोडून मला म्हटले होते.

अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी, एकटी चालत माझ्या ऑफिसमध्ये आली आणि एका दिग्दर्शकाला म्हणाली की, प्लीझ मला काम द्या. मला रडू कोसळले. मी म्हटले तू चित्रपटात काम कर. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साराला खूप ट्रोल करण्यात आले होते. 

Web Title: Sara Ali Khan joined hands with Rohit Shetty and asked for work, the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.