शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतली सारा अली खान, मात्र मीडियाला केले इग्नोर, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 11:42 AM2020-10-13T11:42:27+5:302020-10-13T11:45:37+5:30

'कुली नंबर वन' गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या चित्रपटाचा रिमेक आहे. याशिवाय अक्षय कुमारसह सारा ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

sara ali khan ignore at airport media video viral on internet | शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतली सारा अली खान, मात्र मीडियाला केले इग्नोर, पाहा व्हिडीओ

शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतली सारा अली खान, मात्र मीडियाला केले इग्नोर, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील काही सेलेब्सची चौकशी झाली. यात अभिनेत्री सारा अली खानचे नाव देखील सामिल होते. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानला एनसीबीने समन्स बजावल्यानंतर ती गोव्याहुन मुंबईत आली. सारावर ड्रग्स वापरल्याचे आणि खरेदी केल्याचे आरोप लागले होते. नुकतेच सारा अली खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये सारा अली खान मुंबई विमानतळावर दिसत आहे. व्हिडिओमध्ये साराने सुरक्षेची खबरदारी घेत फेस शिल्ड घातले आहे. नेहमी मीडिया दिसताच हसत- हसत त्यांच्याशी संवाद साधणारी, कॅमे-यांना पोजवर पोज देणारी साराने यावेळी मात्र मीडियाला पोज देणे तर सोडाच चक्क दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये सारा अली खान माध्यमांकडे पाठ फिरवल्याचे  स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. साराच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही ब-याच कमेंटस येत असल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईमध्ये तिच्या चित्रपटाचे शूटिंग सूरु होते. तेच पूर्ण करून ती आता मुंबईत परतली आहे.त्याचबरोबर सारा लवकरच वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' चित्रपटात दिसणार आहे. 'कुली नंबर वन' गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या चित्रपटाचा रिमेक आहे. याशिवाय अक्षय कुमारसह सारा ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

NCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स

चौकशी दरम्यान सारा अली खान म्हणाली तिने कधीच ड्रग्स घेतले नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील ड्रग्स न घेतल्याचे सांगितले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार साराने एनसीबीसमोप सांगितले की, केदारनाथ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आणि त्यानंतर सुशांतने तिच्यासमोर ड्रग्स घेतले होते. श्रद्धाने ही स्वत: कधीच ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे सांगितले पण सुशांत ड्रग्स घ्यायचा असे तेही म्हणाली. रिया चक्रवर्तीच्या जबाबानुसार एनसीबीने सारा आणि श्रद्धाची चौकशी केली. मात्र या दोघींचे ड्रग्सबाबत कोणतचे चॅट नाही आहेत.

Web Title: sara ali khan ignore at airport media video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.