सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या अफेअरची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता दोघांच्या ब्रेकअपची चर्चासुद्धा रंगली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सारा व कार्तिक एकमेकांना डेट करत होते. पण आता हे नाते संपुष्टात आले आहे. सारा सध्या या ब्रेकअपच्या दुखातून बाहेर येण्यासाठी श्रीलंकेत व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

या व्हॅकेशन दरम्यानचे फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोत सारा स्विमिंग पूलमध्ये बसून कॉफीचा आनंद घेते आहे. तर एका फोटो सारा समुद्राच्या किनारी उभी राहिलेली आहे. या फोटोंना साराने 'लेडी इन लंका' असे कॅप्शन दिले आहे. 


सारा आणि कार्तिकच्या ब्रेकअपचे पर्सनल नाही तर प्रोफेशनल कारणामुळे झाल्याची माहिती आहे. कार्तिक व सारा आपआपल्या प्रोजेक्टमध्ये इतके बिझी आहेत की एकमेकांना वेळ देणे त्यांना अशक्य झाले आहे. ‘लव्ह आज कल 2’चे शूटींग संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी नाही नाही तो खटाटोप केला. पण बिझी शेड्यूल या दोघांच्या रोमान्सच्या आड येतेय. कार्तिकने ‘पती पत्नी और वो’चे शूटींग पूर्ण केले. यानंतर लगेच तो ‘दोस्ताना 2’मध्ये बिझी झाला. पुढील महिन्यापासून कार्तिक या चित्रपटाचे शूटींग सुरू करतोय. खरे तर कार्तिक व सारा दोघांनीही आपले नाते कधीच लपवले नाही.

कार्तिक ‘पती पत्नी और वो’च्या शूटींगमध्ये बिझी असताना सारा तिनदा त्याला भेटायला लखनौला गेली होती. कार्तिकही साराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बँकॉकला गेला होता. पण वेळेचे गणित मॅच करता करता दोघांच्याही नाकीनऊ आले. इतके की, यानंतर दोघांनीही आपआपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला.


सारा अली खानने 'केदारनाथ' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच साराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली आहेत.  
 

Web Title: Sara ali khan enjoying vacation in sri lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.