'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये विकी कौशलसोबत दिसणार सारा अली खान, सिनेमासाठी घेतेय अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 03:38 PM2021-03-26T15:38:54+5:302021-03-26T15:46:08+5:30

की कौशल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे.

Sara ali khan to be join vicky kaushal film the immortal ashwatthama lets check repot | 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये विकी कौशलसोबत दिसणार सारा अली खान, सिनेमासाठी घेतेय अशी मेहनत

'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये विकी कौशलसोबत दिसणार सारा अली खान, सिनेमासाठी घेतेय अशी मेहनत

googlenewsNext

दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'ची घोषणा झाल्यापासून कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. यात मुख्य भूमिकेत विक्की कौशल दिसणार आहे. त्याचबरोबर या सिनेमातीव मुख्य अभिनेत्री कोण याची माहिती समोर आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार सारा अली खान यात जबदरस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. विकीच्या अपोझिट या सिनेमात तिची वर्णी लागली आहे. अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. यात सारा भरपूर अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे.   

रिपोर्टनुसार,  सारा या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ट्रेनिंग घेते आहे. सारा अली खान दररोज जिममध्ये जाते आणि तिच्या फिटनेसची खास काळजी घेत आहे. यासह, सारा 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'साठी अ‍ॅक्शन मास्टरकडून खास क्लास घेत आहे जेणेकरुन ती विकी कौशलसोबत  'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये अ‍ॅक्शन करू शकेल.

मीडिया रिपोर्टनुसार विकी कौशल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे. तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे. सिनेमाचे शूटिंग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. ग्रीनलँड, आइसलँड व्यतिरिक्त इंग्लंड, टोकियो, न्यूझीलंड आणि नामीबिया हेदेखील असतील.

Web Title: Sara ali khan to be join vicky kaushal film the immortal ashwatthama lets check repot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.