sapna chaudhary bollywood debut with dosti ke side effect | सपना चौधरीचा डान्स खूप बघितला! आता ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूड डेब्यू!!
सपना चौधरीचा डान्स खूप बघितला! आता ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूड डेब्यू!!

आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने लोकांना वेड लावणारी सपना चौधरी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. होय, हरियाणाची ही लोकप्रीय डान्सर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात थिरकताना दिसली. आता ती अभिनय करतानाही दिसणार आहे. होय, ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या बॉलिवूडपटात सपनाची वर्णी लागली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत आनंद दिसणार आहे. जोयल डॅनिअलची निर्मिती असलेला हा चित्रपट हादी अली अबरार दिग्दर्शित करणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’चे जुबैर खान आणि अंजू जाधव यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बिग बॉसच्या ११ व्या सीझनमध्ये सपना चौधरी दिसली होती. या घरातील तिचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. सध्या सपना चर्चेत आहे ती तिच्या मेकओव्हरमुळे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सपनाने जबरदस्त ग्लॅमरस मेकओव्हर केला आहे.
सपनाने खूप लहान वयात स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.


Web Title: sapna chaudhary bollywood debut with dosti ke side effect
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.