बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आमिर खानच्या चित्रपटातून केला होता डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 07:30 PM2019-10-04T19:30:49+5:302019-10-04T19:31:13+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं तिच्या आगामी चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sanya Malhotra Shared look from Shakuntala Devi Biopic | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आमिर खानच्या चित्रपटातून केला होता डेब्यू

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?, आमिर खानच्या चित्रपटातून केला होता डेब्यू

googlenewsNext


बधाई हो आणि फोटोग्राफ या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर छाप उमटविणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा लवकरच शकुंतला देवी बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये तिला ओळखताच येत नाही आहे. 

शकुंतला देवी चित्रपटात सान्या शकुंतला देवी यांची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी पहिल्यांदाच सान्या स्ट्रेट केसांमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच वेगळी दिसते आहे. सान्याने शकुंतला देवी बायोपिकमधील दोन पोस्टर्स इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं की, थांबा... पुस्तकावरील कव्हरपासून परीक्षण करू नका, त्याच्या मागे काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत रहा - उद्या. 


या फोटोत सान्या पुस्तकाच्या मागे आपलं तोंड लपवताना दिसते आहे. तर दुसऱ्या फोटोत हसताना दिसते आहे.


यापूर्वीदेखील सान्याने विद्या बालनसोबत रिडिंग सेशनचा फोटो शेअर केला होता आणि लिहिलं होतं की, यासाठी खूप एक्साइटेड आहे. कौशल्य असलेल्या दोन प्रतिभा जेव्हा एका स्क्रीप्टसाठी एकत्र येतात. 
सान्याने एका ऑफिशिएल स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की ती शकुंतला देवी चित्रपटात शकुंतला देवींच्या मुलीची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे.


ती म्हणाली होती की, आयकॉनिक शकुंतला देवी यांची मुलगी अनुपमा बॅनर्जीची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. सर्व लोकांना गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या कौशल्याबद्दल माहित आहे. मी या सिनेमात आई व मुलीचं नातं रुपेरी पडद्यावर दर्शवण्यासाठी आणि विद्या बालन यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. 


सान्याने बॉलिवूडमध्ये दंगल चित्रपटातून पदार्पण केले होते. दंगलनंतर ती पटाखा, बधाई हो व फोटोग्राफ या चित्रपटात झळकली आहे.

Web Title: Sanya Malhotra Shared look from Shakuntala Devi Biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.