Birthday Special : संजय खान यांनी हॉटेलमध्ये केली होती झीनत अमानला  मारहाण...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 10:30 AM2019-01-03T10:30:17+5:302019-01-03T10:31:55+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (३ जानेवारी) वाढदिवस. ७८ वर्षांच्या संजय खान यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली.

sanjay khan birthday special love story with zeenat aman | Birthday Special : संजय खान यांनी हॉटेलमध्ये केली होती झीनत अमानला  मारहाण...!!

Birthday Special : संजय खान यांनी हॉटेलमध्ये केली होती झीनत अमानला  मारहाण...!!

ठळक मुद्दे८० च्या दशकांत  संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या. अनेक मासिकांत संजय व झीनत यांनी गुपचूप लग्न केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. १९८० मध्ये झीनतच्या आयुष्यात संजय खान यांची एन्ट्री झाली. ‘अब्दुल्ला’च्या सेटवर दोघांत प्रेम बहरले. य

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (३ जानेवारी) वाढदिवस. ७८ वर्षांच्या संजय खान यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली. यानंतरच्या तीन दशकांच्या करिअरमध्ये संजय खान यांनी सुमारे ३० चित्रपटांत काम केले. संजय खान त्यांच्या चित्रपटांशिवाय आपल्या लव्हस्टोरीमुळेही चर्चेत राहिले. आज जाणून घेऊ यात त्यांच्या आयुष्याशी निगडीत असाच एक किस्सा...

८० च्या दशकांत  संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या. अनेक मासिकांत संजय व झीनत यांनी गुपचूप लग्न केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. १९८० मध्ये झीनतच्या आयुष्यात संजय खान यांची एन्ट्री झाली. ‘अब्दुल्ला’च्या सेटवर दोघांत प्रेम बहरले. यानंतर प्रत्येक मॅगझिनमध्ये संजय खान व झीनत यांच्या अफेअरच्या बातम्या झळकू लागल्या. खरे तर संजय खान विवाहित होते. तीन मुलांचे बाप होते. पण तरिही झीनत त्यांच्यावर भाळली.


 
‘अब्दुल्ला’चे शूटिंग झाल्यानंतर झीनत दुसºया चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली. याचदरम्यान एक दिवस संजय खान यांनी झीनतला फोन करून एका गाण्याच्या शूटींगसाठी बोलवले.  मात्र व्यस्त शेड्यूल्डमुळे झीनतने नकार दिला. झीनतच्या नकारामुळे संजय इतके भडकले त्यांनी झीनतला खूप बरेवाईट सुनावले. यामुळे घाबरुन झीनत त्यांच्या घरी गेली. त्यावेळी संजय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्याचे झीनतला कळले. झीनत तेथे पोहोचली. एका मॅगॅझिनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या हॉटेलमध्ये झीनतला पाहून संजय खान यांचा राग इतका अनावर झाला की, त्यांनी झीनतवर हात उगावला. त्यांनी तिला इतकी जबर मारहाण केली की, झीनताच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या एका डोळ्याची दृष्टी कमी झाली.  इतकेच नाही तर झीनत यांना दिवसातून तीन वेळा एन्टी डिप्रेसेंट्सचे औषधही घ्यावे लागायचे. या घटनेनंतर झीनत आणि संजय खान यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते.त्यानंतर  तिने मजहर खान यांच्याशी लग्न केले. संजय खान यांनी ‘द बिग मिस्टेक आॅफ माय लाईफ’ या आपल्या बायोग्राफीत या घटनेचा उल्लेख केला आहे.


 संजय खान हे अभिनेता हृतिक रोशन सासरे आहेत. संजय खानची मुलगी सुझान खानसोबत हृतिकचे लग्न झाले होते. पण दोघांचा घटस्फोट झाला. 
 

Web Title: sanjay khan birthday special love story with zeenat aman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.