Sanjay Kapoor Share pic of his wedding which shows Arjun kapoor bored | संजय कपूर अर्जुन कपूरच्या लग्नात होणार BORE, सोशल मीडियावरील लग्नाच्या फोटोची चर्चा
संजय कपूर अर्जुन कपूरच्या लग्नात होणार BORE, सोशल मीडियावरील लग्नाच्या फोटोची चर्चा

सोशल मीडियावर झक्कास अभिनेता अनिल कपूरचा भाऊ अभिनेता संजय कपूरचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो संजय कपूरच्या लग्नाचा आहे. या फोटोत संजय कपूर आणि महीप यांच्या लग्नाचे विधी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोत तिसरी व्यक्ती दिसत आहे. ही तिसरी व्यक्ती म्हणजे बालपणीचा अभिनेता अर्जुन कपूर आहे. लग्नाच्या बऱ्याच विधीमुळे काहीसा थकलेला अर्जुन यांत दिसत आहे. खुद्द संजय कपूरने याबाबतची माहिती दिली आहे. संजयने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिवाय या फोटोला त्याने कमेंटही दिली आहे. “जेव्हा अर्जुन लग्न करेल त्यावेळी माझे चेहऱ्यावरील हावभाव असे असतील” असं संजयने म्हटले आहे. 

सध्या फोटोमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. संजयचे लग्न मॉडेल राहिलेल्या महीप संधूसोबत झाले आहे. मूळची पंजाबी असलेली महीप NRI असून तिने तिचा दीर्घ काळ ऑस्ट्रेलियात घालवला आहे. महीपने १९९४ मध्ये आलेल्या इला अरुणच्या 'निगोडी कैसी जवानी है' या म्युझिक व्हिडिओत काम केले होते. मात्र त्यानंतर तिला अभिनय क्षेत्रात यश मिळाले नाही. २००२ मध्ये तिने संजय कपूरसोबत लग्न केले. महीप आता ज्वेलरी डिझाइनच्या बिझनेसमधून कोट्यवधी रुपये कमावते. 

 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या चर्चा वारंवार मीडियामध्ये ऐकायला मिळतात. दोघांच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरला एका मुलाखतीत विचारले असता त्याने सांगितले होते की, लग्नाबाबतीत चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण माझे मित्रमंडळी लग्न करून वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यामुळे मला लग्नाबाबत विचारले ही काय मोठी गोष्ट नाही. 


सुरूवातीच्या दिवसांत अर्जुन व मलायकाने आपले नाते लपवून ठेवले होते. मात्र तसे काही नाही कारण नेहमी पार्टीत व एअरपोर्टवर ते दोघे एकत्र पहायला मिळतात. अर्जुन कपूर म्हणाला, मी माझ्या खासगी जीवनात खूप खूश आहे आणि मला असेच जीवन व्यतित करायचे आहे. गेल्या काही महिनांपासून मी बरेच काही लपवून ठेवले आहे, ज्यावेळी सांगण्या सारखे असेल तेव्हा नक्कीच याबद्दल सांगेन. 


Web Title: Sanjay Kapoor Share pic of his wedding which shows Arjun kapoor bored
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.