sanjay dutt wife manyata dutt got trolled for wearing ripped jeans | एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त, लोकांनी केले ट्रोल
एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली संजूबाबाची पत्नी मान्यता दत्त, लोकांनी केले ट्रोल

ठळक मुद्देमान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करण्यात ती कुठलीही कसर सोडत नाही. सध्या मान्यता सोशल मीडियावर ट्रोल होतेय. होय, कारण आहे  मान्यताचा ड्रेस. नुकतीच मान्यता मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिने घातलेला ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ट्रोलर्सच्या हातात तर आयते कोलित सापडले. त्यांनी मान्यताला चांगलेच ट्रोल केले.
यावेळी मान्यताने ब्ल्यू कलरची रिप्ड जीन्स आणि ब्लॅक कलरचा टॉप घातला होता. तिची जीन्स इतकी ओव्हर स्टाईलिश होती की, ट्रोलर्सने लगेच त्यावरून मान्यताला ट्रोल करणे सुरु केले. तिचा फोटो पाहून  thakurchhitauni या नावाच्या एका युजरने भलतीच कमेंट दिली.

‘पागलों की कमी नहीं है इस देश में. किसी को बॉडी ढकने के कपडे नही, जिसके पास है वह ढकता नहीं,’ असे त्याने लिहिले.
‘बिचारी गरीब, कुणीतरी हिला मदत करा,’ असे एका युजरने लिहिले. अनेक युजर्सनी मान्यताला ट्रोल करताना अश्लील भाषेत कमेंट केल्या.

मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे संपूर्ण काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली.
मान्यताचे खरे नाव आहे दिलनवाज शेख.  मुंबईत तिचा जन्म झाला. पण  ती लहानाची मोठी झाली ती दुबईत. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता हे नवे नाव धारण केले.

 

Web Title: sanjay dutt wife manyata dutt got trolled for wearing ripped jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.