ठळक मुद्देमान्यताने 2008 मध्ये संजय दत्तसोबत लग्न केले. दोघांनाही शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करण्यात ती कुठलीही कसर सोडत नाही. दोन मुलांची आई असलेली मान्यता  सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून इथले काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


या फोटोंमध्ये मान्यता एका यॉटवर ब्लॅक बिकिनीत दिसतेय. ‘ वायफाय स्लो असेल आणि सोसाट्याचा वारा असेल, अशा ठिकाणी जा...’, असे कॅप्शन हे फोटो शेअर करताना तिने दिले आहे.   

 अन्य एका फोटोत मान्यता समुद्र किना-यावर फिरताना दिसत आहे तर दुस-या एका फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.  
मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे.

संजयचे संपूर्ण काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती.


मान्यताचे खरे नाव आहे दिलनवाज शेख.  मुंबईत तिचा जन्म झाला. पण  ती लहानाची मोठी झाली ती दुबईत. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता हे नवे नाव धारण केले.

मान्यचा दत्तने फिल्मी करियरची सुरूवात बी ग्रेड चित्रपटातून केली होती. याशिवाय ती २००८ साली कॉमेडी चित्रपट मेरे बाप पहले आपमध्ये दिसली होती. त्याशिवाय ती अभिनेता निमित वैष्णवसोबत लवर्स लाइक यासारख्या सिनेमात झळकली आहे.

मान्यताने 2008 मध्ये संजय दत्तसोबत लग्न केले. दोघांनाही शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत. मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sanjay dutt wife maanayata dutt photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.