पानिपतचे ऐतिहासिक युद्ध रूपेरी पडद्यावर, पाहा Panipat Trailer!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 02:41 PM2019-11-05T14:41:31+5:302019-11-05T14:43:03+5:30

अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर रिलीज झालाय.

Sanjay Dutt Arjun Kapoor Kriti Sanon starrer Panipat Trailer | पानिपतचे ऐतिहासिक युद्ध रूपेरी पडद्यावर, पाहा Panipat Trailer!!

पानिपतचे ऐतिहासिक युद्ध रूपेरी पडद्यावर, पाहा Panipat Trailer!!

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. 

अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर रिलीज झालाय. होय, मराठा साम्राज्याचा इतिहास आणि पानिपतच्या युद्धाची कथा या निमित्ताने रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.  दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी  या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
तीन मिनिटांचा या ट्रेलरमध्ये संजय दत्तची एन्ट्री जबरदस्त आहे. चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सॅनन हिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. यासोबतच   पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पानिपतच्या इतिहास अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात मांडण्याचे आशुतोष गोवारीकर यांचे प्रयत्न या ट्रेलरमध्ये दिसतात.

ट्रेलरमधील अनेक दृश्ये, संवाद अंगावर काटा आणतात. सदाशिवराव पेशव्यांच्या भूमिकेतील अर्जुन कपूर आणि मराठमोठ्या वेशातील क्रिती मनाला भावतात.
या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. २०१६ मध्ये गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली होती. या चित्रपटानंतर गोवारीकर ‘पानिपत’ घेऊन येत आहेत. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  अजय-अतुलने संगीतबद्ध केलेला हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Sanjay Dutt Arjun Kapoor Kriti Sanon starrer Panipat Trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.