‘या’ अभिनेत्रीचे झाले बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 10:24 AM2019-12-19T10:24:47+5:302019-12-19T10:59:47+5:30

ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या

sana khan and melvin louis break up news going viral | ‘या’ अभिनेत्रीचे झाले बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप, हे आहे कारण

‘या’ अभिनेत्रीचे झाले बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देसना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सना खान तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. होय, डॉन्स ट्रेनर मेल्विन लुईसला सना डेट करत होती. खुद्द सनाने अलीकडे याची कबुली दिली होती. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. पण आता सना व लुईस यांच्यात फार काही ‘ऑल वेल’ नसल्याचे कळतेय. 


काही दिवसांपासून एकमेकांच्या पे्रमात वेड्या झालेल्या या कपलने सध्या एकमेकांपासून ‘फारकत’ घेतली आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सना व लुईसचे ब्रेकअप झाले आहे. दोघांमध्ये अनेक मतभेदाचे मुद्दे आहेत. दोघेही हे मतभेद दूर करण्यासाठी जीवाचा आटापीटा करत आहेत. पण अद्यापही ते दूर होऊ शकले नाहीत.

सना आणि लुईस यांनी स्ट्रीट बॉल लीगमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता सनाने यातून अंग काढून घेतल्याचीही खबर आहे. लुईसने हॉटस्टेपर टीम खरेदी केली होती. सना या टीमचा प्रमुख चेहरा होती. पण गेल्या काही दिवसांत सना एकदाही हॉटस्टेपरसाठी मैदानात आली नाही. गत 30 नोव्हेंबरला अखेरची ती मैदानात दिसली होती. यानंतर तिने एकही मॅचला हजेरी लावली नाही.


इतकेच नाही तर सनाने लुईसला अनफॉलो केले आहे. शिवाय स्वत:च्या सोशल अकाऊंटवरचे त्याचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत.


सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

 

Web Title: sana khan and melvin louis break up news going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.