ठळक मुद्देमी अडखळत बोलते ही गोष्ट हृतिकच्या लक्षात आल्यानंतर त्याने मला या भीतीवर मात करण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. त्याने मला एक पुस्तक भेटवस्तू म्हणून दिले. या पुस्तकाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले.

समीरा रेड्डीने नुकत्याच एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सध्या ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबाला देत आहे. समीराने काही महिन्यांपूर्वी एक चॅट शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने तिच्या करियरमध्ये हृतिक रोशनचा मोठा हात असल्याचे सांगितले होते. हृतिकने तिला मदत केल्यामुळेच ती अभिनेत्री बनू शकली असे देखील तिने सांगितले होते.

समीरा रेड्डीने या मुलाखतीत सांगितले होते की, मी इंडस्ट्रीत येण्याच्याआधी मी अडखळत बोलायचे. मला लहानपणी स्पीच प्रोब्लेम होता. त्यामुळे मी कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर बोलताना अडखळत असे. त्यामुळे मी कोणाशीही बोलायचे घाबरायचे. मी एकदम गुपचूप राहायचे. पण या समस्येवर मात करण्यासाठी मला हृतिक रोशनने मदत केली. मी लोकांशी बोलताना लाजायचे. त्यामुळे मी ऑडिशनला जाताना देखील लोक माझ्याबाबतीत काय विचार करतील असा विचार करायचे. पण हृतिक अतिशय चांगला आहे. मी अडखळत बोलते ही गोष्ट हृतिकच्या लक्षात आल्यानंतर त्याने मला या भीतीवर मात करण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. त्याने मला एक पुस्तक भेटवस्तू म्हणून दिले. या पुस्तकाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. या पुस्तकामुळे माझ्या बोलण्यात खूप बदल घडला. मी त्यानंतर स्पीच थेरेपिस्टकडे देखील जाऊन उपचार घेतले. 

समीरा सांगते, या सगळ्यासाठी मी हृतिकचे जितके आभार मानू... तितके कमीच आहेत. मी या गोष्टीसाठी हृतिकची आयुष्यभर ऋणी राहाणार आहे.

समीरा रेड्डी गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेज’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, बोमण ईराणी आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर समीरा बॉलिवूडपासून दूर झाली. यामागे बाळाचे प्लॅनिंग हेच कारण होते. दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी शेअर करताना समीरा यावर बोलली होती. हा आमचा प्लान्ड बेबी आहे. त्यामुळेच मी अनेक प्रोजेक्टला नकार दिला होता, असे तिने सांगितले होते.


Web Title: Sameera Reddy reveals Hrithik Roshan helped her overcome stammering
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.