ठळक मुद्देसलमानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडत असून त्याच्या फॅन्सवर तो किती प्रेम करतो हे व्हिडिओतून दिसून येत आहे. सलमानच्या या चिमुकल्या फॅनचे नाव यशिका वाडके असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सलमान खानला प्रचंड लोकप्रियता असून त्याची एक झलक पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स त्याच्या घरासमोर नेहमीच गर्दी करतात. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकजण सलमानचे फॅन आहेत. सलमान आपल्या चिमुकल्या फॅन्सना तर आवर्जून भेटतो. नुकताच त्याचा त्याच्या एका फॅनसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

दबंग ३ चित्रपटानंतर सलमान खान राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी जोर लावला आहे. राधे चित्रपटाबाबत सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. राधेच्या सेटवरून फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. याच चित्रपटाच्या सेटवरचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओत सलमान चिमुकल्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. 

सलमानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडत असून त्याच्या फॅन्सवर तो किती प्रेम करतो हे व्हिडिओतून दिसून येत आहे. सलमानच्या या चिमुकल्या फॅनचे नाव यशिका वाडके असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेडमध्ये सलमानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात सलमान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला प्रदर्शित होणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे.

राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. यामध्ये व्हीएफएक्सचा वापर केला जाणार असून निर्माते यासाठी बाहुबली आणि बाहुबली २मधील टेक्निकचा वापर करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार हा क्लायमॅक्स सीन २० मिनिटं मोठा असणार आहे आणि त्यासाठी सलमान साडे सात कोटी रुपये देण्यासाठी तयार देखील झाला आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.

Web Title: Salman Khan's video with a young fan goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.