बॉलिवूडमध्ये ब्रेकअप, पॅचअप ही नवी गोष्ट नाही. आता बॉलिवूडमध्ये  एका नव्या ब्रेकअपची चर्चा आहे. होय, सलमान खानच्या एका हिरोईनचे बॉयफ्रेन्डशी ब्रेकअप झाल्याचे कळतेय. आम्ही बोलतोय ते सलमानची हिरोईन स्रेहा उल्लाल हिच्याबद्दल. ऐश्वर्या रायची ‘डुप्लिकेट’ म्हणून ओळखल्या जाणा-या स्नेहाचे ब्रेकअप झाल्याची खबर आहे.
ऑल इंडिया मिक्स्ड मार्टिकल आर्ट्स असोसिएशनचा चेअरमन अवी मित्तल व स्नेहा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता दोघांनीही आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, गत मार्चमध्ये स्रेहा व अवी यांनी एकत्र व्हॅलेन्टाईन डे साजरा केला होता. पण यानंतर काही दिवसांत दोघांमध्ये दुरावा वाढला. या दुराव्याचे कारण म्हणजे, अवीचे सतत बिझी असणे. अवी कामात इतका व्यस्त असे की, तो स्रेहाला जराही वेळ देऊ शकत नव्हता. अखेर स्रेहाने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. काहींच्या मते, अवीच्या आयुष्यात स्रेहाशिवाय अन्य कुणीतरी होते.

स्रेहा व अवी आधी मित्र होते. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. दोघांच्या कुटुंबालाही या नात्याबद्दल माहित होते. अवीच्या सर्व फॅमिली फंक्शनमध्ये स्रेहा जात होती.
२००५ मध्ये सलमान खानने स्रेहाला ब्रेक दिला होता. ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता. पण यानंतर स्रेहा बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही.

२००६ मध्ये सोहेल खानसोबत ‘आर्यन’मध्ये ती झळकली. यानंतर २०१० मध्ये ‘क्लिक’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत दिसली. पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले. यानंतर स्नेहा साऊथच्या चित्रपटांकडे वळली.

तेलगू व कन्नड चित्रपटांत ती दिसली. पण त्यानंतर गत चार वर्षांपासून ती अचानक  चित्रपटांपासून दूर झाली. कारण याकाळात  स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरने पीडित होती. हा एक रक्तासंदभार्तील आजार आहे. यामुळे स्नेहा प्रचंड अशक्त झाली होती. इतकी की, खूप वेळ आपल्या पायांवर उभीही राहू शकत नव्हती. त्याचमुळे ती चित्रपटांपासून दूर राहिली. अगदी अलीकडे स्रेहाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.


 


Web Title: salman khans heroine sneha ullal broke up with boyfriend avi mittal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.