ठळक मुद्दे30 वर्षांनंतर सलमान आणि शहजाद एकत्र काम करत आहे. भारत या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आता ते खूप वेगळे दिसत असून त्यांना ओळखणे देखील कठीण झाले आहे.

अंदाज अपना अपना या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील अमर, प्रेम हे आजही प्रेक्षकांचे तितकेच लाडके आहेत. या चित्रपटातील गोगो, भल्ला, करिश्मा, रवीना, रॉबर्ट, तेजा या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रवीना टंडन, करिश्मा कपूर, शक्ती कपूर, परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला आता जवळजवळ 30 वर्षं झाली आहेत.

सलमानचा भारत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. भारत या चित्रपटाचे आणि अंदाज अपना अपना या चित्रपटाचे खास कनेक्शन असल्याचे वृत्त जागरण डॉट कॉमने दिले आहे. अंदाज अपना अपना या चित्रपटात भल्लाची भूमिका शहजाद खानने साकारली होती. शहजादच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता 30 वर्षांनंतर सलमान आणि शहजाद एकत्र काम करत आहे.

जागरण डॉट कॉमसोबत बोलताना शहजादने ते या चित्रपटाचा भाग असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आता ते खूप वेगळे दिसत असून त्यांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. भारत या चित्रपटातील भूमिकेविषयी जागरण डॉट कॉमशी बोलताना ते म्हणाले, या चित्रपटात मी कतरिना कैफच्या बॉसची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाद्वारे मी अनेक वर्षांनी सलमानसोबत काम करत आहे. सलमान इतक्या वर्षांत अजिबातच बदललेला नाहीये. त्याला मला पाहून आमचे पूर्वीचे दिवस आठवले. 

भारत या चित्रपटाच्या सेटवरील वातावरण खूपच चांगले होते. सेटवर सगळेच एकमेकांची काळजी घेत होते. एखाद्या घराप्रमाणेच या सेटवर वातावरण असल्याचे शहजाद यांनी सांगितले. 

अंदाज अपना अपना या चित्रपटातील भल्ला आणि सलमान यांची केमिस्ट्री भारतमध्ये कशी जमलीय हे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला कळेल.


Web Title: salman khan's Andaz Apna Apna and bharat movie has a special connection
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.