थँक्स माझ्या दबंग हिरो; आता कधीच म्हणणार नाही मी एकटी आहे! कंगनाची सलमानवर स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:07 PM2022-05-12T22:07:11+5:302022-05-12T22:10:41+5:30

कंगनाचे सलमान खानसाठी कौतुकोद्गार; आक्रमक 'पंगा'गर्ल 'शांत' कशी काय झाली?

Salman Khan Wished Dhaakad Kangana Ranaut And Team The Very Best For Their Film Actress Reacted | थँक्स माझ्या दबंग हिरो; आता कधीच म्हणणार नाही मी एकटी आहे! कंगनाची सलमानवर स्तुतीसुमनं

थँक्स माझ्या दबंग हिरो; आता कधीच म्हणणार नाही मी एकटी आहे! कंगनाची सलमानवर स्तुतीसुमनं

googlenewsNext

मुंबई: बॉलिवूडमधील कलाकार माझं कौतुक करताना घाबरतात, अशी तक्रार अभिनेत्री कंगना राणौतनं वारंवार केली आहे. बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर कंगनानं अनेकदा टीका केली आहे. बॉलिवूडमधील बडे कलाकार माझी स्तुती करत नाही, असं कंगनानं अनेकदा म्हटलं आहे. कंगनाची ही तक्रार सलमान खाननं ऐकली. सलमाननं कंगनाच्या धाकड चित्रपटाचा दुसरा ट्रेलर शेअर केला आणि कंगनाला टॅग करत धाकडच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

कंगना राणौतच्या बहुप्रतिक्षित धाकड चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये कंगनाचे जबरदस्त ऍक्शन सीन्स आहेत. चित्रपटात हॉलिवूड चित्रपटाची झलक दिसत असल्याचं म्हणत कंगनाच्या चाहत्यांनी धाकडच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खाननं धाकडचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सलमान खाननं धाकडचा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये सलमाननं कंगना राणौत, अर्जुन रामपाल आणि निर्माते सोहेल मकलाई यांना टॅग केलं आहे. सलमानची पोस्ट पाहून काहींनी आनंद व्यक्त केला आहे, तर काही जण आश्चर्यचकीत झाले आहेत. 

सलमान खाननं धाकडचा ट्रेलर शेअर केल्यानंतर कंगना राणौतनं त्याचे आभार मानले. थँक यू माझ्या दबंग हिरो, असं म्हणत कंगनानं इन्स्टा स्टोरीतून सलमानला धन्यवाद दिले. 'सलमानचं मन सोन्यासारखं आहे. इंडस्ट्रीमध्ये मी एकटी आहे असं मी आता कधीच म्हणणार नाही. धाकडच्या पूर्ण टीमकडून तुझे आभार,' असं कंगनानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत कंगनानं सलमानच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
 

Web Title: Salman Khan Wished Dhaakad Kangana Ranaut And Team The Very Best For Their Film Actress Reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.