salman khan will interrogate by mumbai police in sushant singh rajput suicide case | सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सलमान खानही पोलिसांच्या रडारवर, जाणून घ्या काय आहे कारण

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सलमान खानही पोलिसांच्या रडारवर, जाणून घ्या काय आहे कारण

ठळक मुद्देअलीकडे पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमानची एक्स- मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची चौकशी केली होती.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत अनेकांची चौकशी केली. आता यासंदर्भात बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचीही चौकशी होणार असल्याचे कळतेय.
गेल्या 14 जूनला सुशांतने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला काल बरोबर एक महिना झाला. मात्र अद्यापही सुशांतच्या मृत्यूमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. खासगी आयुष्य, करिअर की आणखी कोणत्या कारणाने त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले, हे कळायला मार्ग नाही.

अनेकांनी सुशांतची आत्महत्या कटाचा भाग असल्याचा आरोप करत, याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही लावून धरली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत. आता पोलिस सलमान खान याचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. याप्रकरणी लवकरच त्याला समन्स जारी होऊ शकतो. अलीकडे पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमानची एक्स- मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची चौकशी केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊस सुशांत सिंह राजपूत याला घेऊन एका चित्रपटाची निर्मिती करणार होता. मात्र अचानक  सलमान खानने सुशांतसोबत चित्रपट करण्यास नकार दिला. 
 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आत्तापर्यंत त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती, त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराची अभिनेत्री संजना सांघी, यशराज फिल्म्स अशा एकूण तीन डझनभर लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
  
 सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांचे जबाब नोंदविणे बाकी असून एका फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 


 

 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: salman khan will interrogate by mumbai police in sushant singh rajput suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.