सलमान खान या चित्रपटात करणार तब्बल तीन विलन्सचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 06:00 AM2020-03-23T06:00:00+5:302020-03-23T06:00:00+5:30

सलमान या चित्रपटात एक नाही तर तब्बल तीन खलनायकांसोबत सामना करताना दिसणार आहे.

Salman Khan will face three villains in Radhey Film TJl | सलमान खान या चित्रपटात करणार तब्बल तीन विलन्सचा सामना

सलमान खान या चित्रपटात करणार तब्बल तीन विलन्सचा सामना

googlenewsNext

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘राधे’ सध्या वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत आहे. आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आलाय. राधे चित्रपट २०२० मधल्या सर्वात मोठ्या चित्रपटांमधील एक आहे. त्यात आता समजतंय की या चित्रपटात सलमान एक नाही तर तब्बल तीन खलनायकांसोबत सामना करताना दिसणार आहे.

राधे चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होणार असून सलमान खान या चित्रपटात एक नाही दोन नाही तर चक्क तीन खलनायकांसोबत दोन हात करताना दिसणार आहे. या तीन खलनायकांच्या भूमिकेत असणार आहेत रणदीप हुड्डा, गौतम गुलाटी आणि सिक्किमचा अभिनेता सांग हे. एवढेच नाही तर, या मध्ये तीन वेगवेगळे एक्शन निर्देशक आहेत, ज्यांनी या चित्रपटातील एक्शन दृश्य कोरियोग्राफ केली आहेत.


‘राधे’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले आहे आणि सलमानसोबत हा त्यांचा तिसरा चित्रपट आहेत. यापूर्वी दोघांनी वॉन्टेड आणि दबंग 3 मध्येदेखील काम केले आहे. चित्रपटात सलमानच्या अपोझिट दिशा पटाणी दिसणार आहे. यासोबतच रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफदेखील चित्रपटात दिसणार आहे. यशराज फिल्म्सव्यतिरिक्त सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री या चित्रपटाचे को-प्रोड्यूसर आहेत.

याशिवाय सलमान खान 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातही झळकणार आहे. यात सलमान खानसोबत अभिनेेत्री पूजा हेगडेची या चित्रपटात वर्णी लागली आहे. पूजा या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Web Title: Salman Khan will face three villains in Radhey Film TJl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.