ठळक मुद्देसलमान मला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो का त्याला जरा तुम्हीच विचारा... या कतरिनाच्या प्रश्नावर सलमान म्हणाला, मी सगळीकडेच तिला फॉलो करतो. आता तर इथून मी तिला तिच्या घरपर्यंत सोडणार आहे. 

भारत हा सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी सलमान आणि कतरिना सोडत नाहीयेत. सलमानला नुकतेच कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम अकाऊंटबद्दल एक गोष्ट विचारण्यात आले आणि त्याने यावर त्याच्या नेहमीच्याच अंदाजात हटके उत्तर दिले. 

सध्या सगळ्याच सेलिब्रेटींचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून ते आपल्या बॉलिवूडमधील मित्रांना, मैत्रिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करताना दिसतात. कतरिनाने काही महिन्यांपूर्वीच इन्स्टाग्रामवर तिचे अकाऊंट सुरू केले आहे. याच तिच्या अकाऊंटबाबत एक खास गोष्ट तिने सांगितली. सलमान आणि कतरिना हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. एकेकाळी तर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना देखील ऊत आला होता. एवढेच नव्हे तर कतरिनाला मैंने प्यार क्यों किया या चित्रपटाद्वारे सलमानने बॉलिवूडमध्ये रि-लाँच केले होते. तसेच तिला त्याने अनेक चित्रपटांमध्ये संधी दिली. त्यामुळेच कतरिनाच्या यशात सलमानचा मोठा हात असल्याचे म्हटले जाते. 

कतरिना आणि सलमानमधील खूप छान केमिस्ट्री त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान देखील पाहायला मिळत आहे. कतरिनाने नुकतेच भारत या चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान मस्करीत म्हटले की, मी सलमानची कोणतीही पोस्ट लाईक करत नाही की त्यावर कमेंट करत नाही. त्याने चांगल्या पोस्ट टाकण्याची गरज आहे. यानंतर कतरिनाने पत्रकारांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणाली, सलमान मला फॉलो करतो का त्याला जरा तुम्हीच विचारा...

या कतरिनाच्या प्रश्नावर सलमानने दिलेले उत्तर ऐकून कोणालाच आपले हसू आवरले नाही. सलमान म्हणाला, मी सगळीकडेच तिला फॉलो करतो. आता तर इथून मी तिला तिच्या घरपर्यंत सोडणार आहे. 

सलमान त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केवळ आठ जणांना फॉलो करतो. त्यातील अरबाज खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, अर्पिता खान शर्मा, सोहेल खान या त्याच्या कुटुंबियातील मंडळींचा समावेश आहे. तसेच तो युलिया वंतूर, इसाबेल कैफ, रेन्येस बेकसेल यांच्या अकाऊंटला फॉलो करतो. 


Web Title: Salman Khan was asked why he does not follow Katrina Kaif on Instagram. His response is hilarious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.