ठळक मुद्देया चित्रपटात सलमान नाही तर सूरज पांचोलीसोबत इसाबेल रोमान्स करताना दिसेल.

सलमान खानने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. यातलेच एक नाव म्हणजे, कतरीना कैफ. सलमान आणि कतरीना यांची स्टोरी बरीच मोठी आहे. त्यांचे नातेही खास आहे. नात्यातील अनेक चढऊतारानंतरही त्यांची मैत्री आजही टिकून आहे. कदाचित याच मैत्रीखातर सलमानने पुन्हा एकदा कतरीनाला मदतीचा हात देऊ केला आहे. होय, कतरीनाची बहीण इसाबेल कैफ हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची जबाबदारी सलमानने आपल्या खांद्यावर घेतली आहे. इसाबेल ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून डेब्यू करतेय आणि इसाबेलचा डेब्यू अगदी परफेक्ट व्हावा,अशी सलमानची इच्छा आहे. याचमुळे हा चित्रपट रिशूट करण्याचा निर्णय सलमानने म्हणे घेतलाय.


होय,तुम्ही ऐकले ते अगदी खरे आहे. इसाबेलच्या डेब्यू चित्रपटावर सलमान अगदी जातीने लक्ष ठेवून आहे. सलमानने अलीकडे या चित्रपटाचा काही भाग पाहिला. पण चर्चा खरी मानाल तर   हा चित्रपट पाहून कमालीचा निराश झाला. त्यातली काही दृश्ये सलमानला मुळीच आवडली नाहीत. सूत्रांचे मानाल तर यानंतर सलमानने मेकर्सला या चित्रपटाचा एक मोठा भाग नव्याने शूट करण्याचे आदेश् दिलेत. चित्रपटाची कथा ज्यापद्धतीने पडद्यावर रेखाटली गेली, ती सलमानला आवडली नसल्याचे कळतेय. स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय आणि आता दिग्दर्शक विनय आणि राधिका सप्रू हेही या चित्रपटाशी जुळल्याचे समजतेय.


एकंदर काय तर कतरीनाप्रमाणेच इसाबेल हिलाही बॉलिवूडमध्ये हिट करण्यासाठी भाईजानने कंबर कसलीय. आता या प्रयत्नात भाईजान किती यशस्वी होतो आणि ईसाबेलचा पहिला डेब्यू सिनेमा बॉक्सआॅफिसवर किती कमाई करतो, ते बघूच.

या चित्रपटात सलमान नाही तर सूरज पांचोलीसोबत इसाबेल रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटात दोघेही सालसापासून तर पासो दोबलेपर्यंत अनेक डान्स फॉर्म्स करताना दिसतील. चित्रपटात इसाबेल  बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात.


Web Title: salman khan wants katrina kaif sister isabelle kaif debut film to be reshoot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.